टायरमध्ये हवा भरण्याची झंझट संपली, बाजारात आलाय नवीन टेक्नोलॉजीचं Tyre; फायदे तोटे लगेच समजून घ्या

Last Updated:

चला, या futuristic टायरची रचना, फायदे, किंमत आणि तोटे जाणून घेऊया…

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : आजकाल वाहन मालकांची एकच इच्छा असते. गाडी सुरक्षित असावी, परफॉर्मन्स जबरदस्त असावा आणि मेंटेनन्स कमीत कमी. अशा वेळी बाजारात आलेली एअरलेस टायर ही नवी टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठा बदल घडवू शकते. या टायरसाठी हवा भरायची गरज नसते, म्हणजेच न पंचर, न ब्लास्ट, न एअर प्रेशरची झंझट. त्यामुळे ड्रायव्हिंग आणखी सुरक्षित आणि स्मूद होऊ शकते. चला, या futuristic टायरची रचना, फायदे, किंमत आणि तोटे जाणून घेऊया…
एअरलेस टायर म्हणजे नक्की काय?
एअरलेस टायरची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात हवेची आवश्यकता नसते. म्हणजेच हवा भरावी लागणार नाही, पंचर होण्याची शक्यता कमी आहे, टायर फुटण्याचा ही धोका नाही.
रचना (Structure) कशी असते?
या टायरमध्ये हवेखाली जागा असते ती भरून काढली जाते स्पेशल रबर स्पोक्स आणि मजबूत बेल्टने. हे स्पोक्स टायरला स्थिरता देतात आणि आकार कायम ठेवतात. त्यामुळे टायर खराब होण्याची शक्यता खूपच कमी राहते.
advertisement
फ्यूचरिस्टिक डिझाइन
या टायरचे आतले सगळे स्ट्रक्चर बाहेरून दिसते, त्यामुळे ते भविष्यातील गाड्यांसारखा मॉडर्न लूक देतात. हे टायर जवळजवळ मेंटेनन्स-फ्री असतात. त्यांना एअर प्रेशर चेक करण्याची गरज नाही, पंचर दुरुस्तीचा त्रास नाही शिवाय खराब रस्त्यांवरही स्टेबल परफॉर्मन्स आहे, त्यामुळे लांब ड्राईव्ह, हायवे ट्रिप्स आणि ऑफ-रोडिंगसाठीही हे उत्तम पर्याय बनत आहेत.
एअरलेस टायर किती महाग आहेत?
सध्या ही टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे यांची किंमत जास्त आहे. याची किंमत सुमारे ₹10,000 ते ₹20,000 प्रति टायर आहे, तरी ही किंमत ब्रँड, साईज आणि स्पेसिफिकेशननुसार बदलते. साधारण ट्यूबलेस टायरची किंमत ₹1,500 ते ₹6,000 पासून सुरू होते. म्हणजे एअरलेस टायर हे सध्या तुलनेत अनेक पटीने महाग आहेत. तज्ज्ञांच्या मते उत्पादन वाढल्यावर या टायरची किंमत लक्षणीय कमी होऊ शकते.
advertisement
फायदे कितीही असले तरी या टायरमध्ये काही मर्यादा आहेत:
1. सवारी थोडी कठीण वाटू शकते
टायर मजबूत असल्याने खड्डे किंवा उबडखाबड रस्त्यांवर जास्त झटके जाणवू शकतात.
2. जास्त ड्रॅग (Drag)
टायरचा रस्त्याशी संपर्क जास्त असल्याने इंजिन किंवा मोटरवर अधिक ताण येतो.
3. मायलेज/रेंज कमी होऊ शकते
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रेंज कमी होऊ शकते, तर पेट्रोल/डिझेल वाहनांमध्ये मायलेज कमी होतो.
advertisement
4. आवाज आणि कंपन वाढते
इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन नसल्याने टायरचा आवाज आणि कंपन केबिनमध्ये जास्त ऐकू येतो.
एअरलेस टायर ही पुढील काही वर्षांत वाहन उद्योगात खूप मोठी क्रांती घडवू शकणारी टेक्नॉलॉजी आहे. पंचरचा त्रास संपणार आणि सुरक्षितता वाढणार. पण सध्या त्यांचा खर्च जास्त आहे आणि काही परफॉर्मन्स-संबंधित मर्यादाही आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
टायरमध्ये हवा भरण्याची झंझट संपली, बाजारात आलाय नवीन टेक्नोलॉजीचं Tyre; फायदे तोटे लगेच समजून घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement