'कधीच एकमेकींना नावाने आवाज दिला नाही', प्रिया मराठेबद्दल बोलताना भावुक झाली मृणाल दुसानिस

Last Updated:
मृणाल आणि प्रिया यांनी तू तिथे मी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. प्रियाविषयी बोलताना मृणाल भावुक झाली.
1/8
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला. प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. तिने एकदा कॅन्सरवर मातही केली पण अखेर कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला.
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला. प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. तिने एकदा कॅन्सरवर मातही केली पण अखेर कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला.
advertisement
2/8
प्रियाच्या निधनानंतर मराठीच नाही तर हिंदी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार तिच्याविषयी बोलताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या पोस्टमधून, बोलण्यामधून प्रिया त्यांच्यासाठी किती स्पेशल होती, ती माणूस म्हणून कशी होती हे पाहायला मिळतंय.

3/8
मैत्रिणींसाठी प्रिया जीव की प्राण होती. मैत्रिणींना ती एका खास नावाने हाक मारायची. तिची सहकलाकार मृणाल दुसानिसने याबद्दल सांगितलं.
मैत्रिणींसाठी प्रिया जीव की प्राण होती. मैत्रिणींना ती एका खास नावाने हाक मारायची. तिची सहकलाकार मृणाल दुसानिसने याबद्दल सांगितलं.
advertisement
4/8
 मृणाल आणि प्रिया यांनी तू तिथे मी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची घट्ट मैत्री होती. प्रियाच्या निधनानंतर तिच्याविषयी बोलताना मृणाल भावुक झाली.
मृणाल आणि प्रिया यांनी तू तिथे मी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांची घट्ट मैत्री होती. प्रियाच्या निधनानंतर तिच्याविषयी बोलताना मृणाल भावुक झाली.
advertisement
5/8
लोकमत फिल्मीशी बोलताना मृणाल म्हणाली,
लोकमत फिल्मीशी बोलताना मृणाल म्हणाली, "प्रिया आणि मी कधीच एकमेकांना नावाने आवाज दिली नाही. आम्ही एकमेकांना ये वेडे... अगं वेडे... अशीच हाक मारायचो."
advertisement
6/8
 "प्रिया इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देतेय हे आम्हाला खूप उशिरा कळलं. तिने हे फार पटकन बाहेर येऊ दिलं नाही. तिने एकटी एकटीने अनेक महिने हे सगळं सहन केलं."
"प्रिया इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देतेय हे आम्हाला खूप उशिरा कळलं. तिने हे फार पटकन बाहेर येऊ दिलं नाही. तिने एकटी एकटीने अनेक महिने हे सगळं सहन केलं."
advertisement
7/8
मृणाल पुढे म्हणाली,
मृणाल पुढे म्हणाली, "आत्ता आत्तापर्यंत काही दिवसांपर्यंत आम्ही तिच्याशी बोलत होतो. कशीयेस, काळजी घे, आमच्या प्रत्येक कॉलमध्ये प्रियाचा विषय निघायचा."
advertisement
8/8
मृणालने पुढे सांगितलं,
मृणालने पुढे सांगितलं, "प्रिया कधीच आमच्या विचारांतून गेली नाही. चांगल्या वाईट काळात नेहमीच तिला विचार डोक्यात यायचा. खास होती ती. आज मोबाईल ऑन केल्यावर प्रत्येकजण तिच्याबद्दल इतकं बोलतोय. ती मुलगीच तशी गोड होती. आता काहीच बोलायला सुचत नाहीये."
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement