4 वर्षांपासून पाठपुरावा, निर्माता मंदार देवस्थळीने शशांक केतकरचे किती पैसे थकवलेत?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shashank Ketkar - Mandar Devasthali Controversy : अभिनेता शशांक केतकर गेल्या चार वर्षांपासून त्याच्या थकलेल्या पैशांचा पाठपुरावा करतोय. निर्माते मंदार देवस्थळी यांनी शशांकचे नेमके किती पैसे थकवलेत?
advertisement
'हे मन बावरे' ही मालिका संपून अनेक वर्षं उलटली असली तरीही कलाकारांना अद्याप संपूर्ण मोबदला मिळालेला नाही, असा आरोप शशांक केतकरने केला आहे. याबाबत तो गेल्या 4 वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असल्याचंही त्याने सांगितलं. यापूर्वीही शशांकने वेळोवेळी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली होती. अनेकदा मंदार यांनी वेळ मागितला, पैसे देण्याचं आश्वासन दिलं मात्र पैसे दिलेच नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
थकबाकीच्या रकमेबाबत बोलताना शशांकने स्पष्ट केलं की, "5,00,000 ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे पर डे प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यानी पेमेंट देताना TDS कापला आणि गव्हरमेन्टला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे."
advertisement
advertisement









