Angarki Chaturthi 2026 : बाप्पाला नैवेद्यासाठी मोदकच का दाखवतात? 21 मोदकच द्यायचे हे कोणी ठरवलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपण श्रद्धेने बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, बाप्पाला 21 च मोदक का दाखवतात? आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकाच का?
अंगारकी संकष्टी चतुर्थीजवळ आली की आदल्या दिवसापासून घरात बाप्पाच्या नैवेद्याची लगबग सुरू झाली असेल. जेव्हा आपण गणपती बाप्पाचा विचार करतो, तेव्हा डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे 'मोदक'. मग तो मऊ, गोरापान लुसलुशीत उकडीचा असो वा खमंग तळलेला मोदक. आपण श्रद्धेने बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, बाप्पाला 21 च मोदक का दाखवतात? आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकच का?
advertisement
advertisement
21 आकड्याचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्वधार्मिक शास्त्रानुसार, गणपती हा बुद्धीची देवता आहे. 21 हा आकडा पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश), पाच ज्ञानेद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण आणि एक मन यांचे प्रतीक मानले जाते. या 21 गोष्टी बाप्पाला अर्पण करणे म्हणजे आपले संपूर्ण अस्तित्व देवा चरणी अर्पण करणे होय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुगरणींसाठी खास टीप:अंगारकीच्या दिवशी घरातील सर्वांची धावपळ असते. अशा वेळी 21 मोदक वळताना घाई होऊ शकते. पण लक्षात ठेवा, मोदकाच्या उकडीत थोडे तेल आणि मीठ व्यवस्थित घातले तर मोदक फुटत नाहीत. बाप्पाला नैवेद्य दाखवताना तो गरम असतानाच त्यावर साजूक तुपाची धार धरायला विसरू नका, कारण तुपामुळे मोदकाचे पौष्टिक मूल्य दुप्पट होते.तर यंदा जेव्हा तुम्ही 21 मोदक बनवाल, तेव्हा मनात हा विचार नक्की ठेवा की तुम्ही केवळ नैवेद्य बनवत नसून आपल्या कुटुंबाला आरोग्याचा एक मौल्यवान ठेवा देत आहात.









