advertisement

Subhedar : 'सुभेदार'ची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात; पहिल्या दोन दिवसातच पार केला इतक्या कोटींचा टप्पा

Last Updated:
दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट 'सुभेदार' 25 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अनेक विक्रम मोडले होते. आता या चित्रपटाने दोन दिवसात किती कोटी कमावलेत जाणून घ्या.
1/8
सुभेदार हा चित्रपट नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील पराक्रमावर आधारित आहे. या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर झळकले आहेत.

2/8
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेच स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे  प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

3/8
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना तुफान उत्सुकता होती. त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल्ल झाला आहे.

4/8
राज्यातील 350 हून अधिक चित्रपटगृहांतील 900 पेक्षा जास्त शोज सह देशातल्या विविध शहरांत 'सुभेदार' प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी सगळीकडं या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.

5/8
Sacnilk या वेबसाईटच्या माहितीनुसार, पहिल्याचं दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1 कोटी 5 लाखांची कमाई केली.

6/8
 आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षाही जास्त कमाई केली आहे.

7/8
 या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल 1 कोटी 75 लाखांची कमाई केली असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आतापर्यंत सुभेदारने 2 कोटी 80 लाखांचा गल्ला जमवला आहे. दोन दिवसात या चित्रपटाने 3 कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

8/8
आता विकेंडला सुभेदार किती गल्ला जमावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement