JCB नेहमी पिवळ्या रंगाचाच का असतो? 'ही' आहे त्यामागची खास गोष्टी, नावातही आहे 'हे' वेगळेपण!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जेसीबीला सहसा बुलडोझर म्हणतात, पण तुम्ही कधी त्याच्या नावाकडे आणि रंगाकडे लक्ष दिले आहे का? त्याचे खरे नाव काय आहे? त्याचा रंग नेहमी पिवळा का असतो? कदाचित कोणालातरी माहीत असेल, तर चला जाणून घेऊया त्याच्या खऱ्या नावाची आणि रंगामागची गोष्ट...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जेसीबी हे मशीनचे नाव नसून त्या मशीनला बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. जेसीबी म्हणजे जोसेफ सिरिल बामफोर्ड एक्सकॅव्हेटर्स लिमिटेड (Joseph Cyril Bamford Excavators Limited). ही कंपनी 1945 मध्ये जोसेफ सिरिल बामफोर्ड यांनी सुरू केली होती. खरं तर, या कंपनीचे नाव आता या मशीनशी इतके जोडले गेले आहे की तेच त्याचे नाव बनले आहे.
advertisement
ज्याला आपण जेसीबी मशीन म्हणतो, त्याचे खरे नाव बॅकहो लोडर (Backhoe Loader) आहे. भारत, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये सर्व प्रकारच्या खोदकाम करणाऱ्या मशीन्ससाठी 'जेसीबी' हा शब्द सर्रास वापरला जातो. आता 'जेसीबी' हा शब्द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्येही समाविष्ट करण्यात आला आहे, जरी तो अजूनही ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत आहे.
advertisement