General Knowledge: समुद्राच्या एका लिटर पाण्यात किती मीठ असते? आकडा वाचून थक्क व्हाल!

Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का की समुद्राचे पाणी खारट का असते? यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत. एका लिटर समुद्राच्या पाण्यात सरासरी...
1/6
 समुद्राचं पाणी इतकं खारट असतं की, कितीही तहान लागली तरी ते पिऊ शकत नाही. तुम्हाला माहीत आहे का की, एका लिटर समुद्राच्या पाण्यात किती मीठ असतं? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊया...

advertisement
2/6
 समुद्राच्या पाण्यात अनेक प्रकारचे खनिज पदार्थ (minerals) विरघळलेले असतात. यापैकी सर्वात जास्त प्रमाणात सोडियम क्लोराईड (sodium chloride) असतं, ज्याला आपण सामान्य भाषेत मीठ (salt) म्हणतो. एका लिटर समुद्राच्या पाण्यात सरासरी 35 ग्रॅम मीठ असतं. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एक लिटर समुद्राचं पाणी उकळलं आणि ते पूर्णपणे आटवलं, तर तुम्हाला जवळपास एक चमचा मीठ मिळेल.

3/6
 आता प्रश्न येतो की, समुद्राच्या पाण्यात हे मीठ येतं कुठून? असं म्हणतात की, जेव्हा पावसाचं पाणी खडकांवर पडतं, तेव्हा ते खडकांमध्ये विरघळलेले खनिज पदार्थ सोबत घेऊन येतं. हे पाणी नद्यांमधून समुद्राला मिळतं आणि ते खनिज पदार्थ तिथे जमा होतात.

4/6
 याशिवाय, ज्वालामुखीच्या उद्रेकातूनही अनेक प्रकारचे खनिज पदार्थ समुद्रात पोहोचतात. असंही म्हटलं जातं की, समुद्राच्या तळापासून अनेक प्रकारचे खनिज पदार्थ बाहेर पडत असतात, जे समुद्राच्या पाण्यात मिसळतात.

5/6
 मात्र, समुद्राच्या प्रत्येक भागात मिठाचं प्रमाण सारखं नसतं. काही समुद्रांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, तर काही ठिकाणी ते कमी असतं. उदाहरणार्थ, मृत समुद्रात (Dead Sea) मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणूनच तिथे कोणतंही जीवजंतू तग धरू शकत नाही.

6/6
 समुद्राच्या पाण्याची क्षारता सागरी जीवासाठी खूप महत्त्वाची असते. अनेक सागरी जीवांना जगण्यासाठी खारट पाण्याची गरज असते. याव्यतिरिक्त, समुद्राची क्षारता समुद्राचं तापमान आणि घनता यावर परिणाम करते, जे समुद्रातील प्रवाहांची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement