Today Weather : आता स्वेटरनं भागणार नाही, कल्याण डोंबिवलीत पारा घसरला; पाहा संपूर्ण अपडेट
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Kalyan-Dombivli Weather Today : महाराष्ट्रातील विविध भागात हवामानात थंडी जाणवत आहे. चला तर आज जाणून घ्या ठाणे जिल्ह्याच्या कल्याण-डोंबिवलीमध्ये वातावरण कसं आहे.
राज्यात हवामानाचे विचित्र रंग पाहायला मिळत आहेत.तापमानात सतत चढ उतार होत असताना ६डिसेंबरला ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली शहरात तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता.सकाळी आणि सायंकाळच्या वेळी बोचरी थंडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. काही भागांत दुपारच्या वेळी देखील गारवा जाणवत आहे.पाहुयात ७डिसेंबर ला कल्याण डोंबिवली शहरातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
आज कल्याणमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे आहे, किमान तापमान सुमारे २१°C ते २०.४°C आणि कमाल तापमान ३४°C ते ३३.७°C च्या दरम्यान आहे, दिवसा तापमान साधारणपणे २२°C ते २८°C च्या दरम्यान असेल तर रात्री तापमान कमी होऊन थंडी जाणवेल. आणि हवामान कोरडं असल्याने कल्याणमध्ये हवेत आर्द्रता कमी आणि आकाश निरभ्र राहील, ज्यामुळे दिवसभर उन्हाळी हवामान अनुभवण्यास मिळाले आणि हलक्या वाऱ्यासह वातावरण सुखद राहील, असा अंदाज आहे.
advertisement
डोंबिवलीमध्ये हवामान स्वच्छ आणि निरभ्र राहण्याचा अंदाज आहे, दुपारनंतर हवामान आल्हाददायक असेल, कमाल तापमान सुमारे ३३-३४°C आणि किमान तापमान २०-२२°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे .वारा१० ते १५ किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. महाराष्ट्रात थंडी वाढत असली तरी आजचा दिवस डोंबिवलीसाठी सुखद हवामानाचा असेल, जिथे दिवसा ऊबदार आणि संध्याकाळी हलक्या थंडीचा अनुभव येऊ शकतो.
advertisement
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून, तापमानात चढ-उतार जाणवतील, थंडीची चाहूल लागेल पण जोरदार थंडी नसेल,हवामान स्वच्छ, अंशतः ढगाळ आणि दमट राहण्याची शक्यता आहे.तापमान साधारणपणे ३३°C च्या आसपास तापमान (उच्च) अपेक्षित आहे,वारे १० ते १५ किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात.हवामानातील बदलांमुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार होऊ शकतात, त्यामुळे खबरदारी घ्या.
advertisement
जिल्ह्यातील हवामानात चढ उतार होत असताना बदलापूर शहरात हवामान स्वच्छ आणि ऊबदार राहण्याची शक्यता आहे, दिवसा तापमान सुमारे २५°C ते ३१°C च्या दरम्यान असू शकते,तर मुरबाड शहापूर एक पट्ट्यात येणाऱ्या तालुक्यातील हवामान एक अंकी असल्याने तापमान किमान १४°C आणि कमाल ३६°C च्या आसपास राहू शकते,तिन्ही शहरात दिवसभर हवामान कोरडे आणि स्वच्छ असेल


