प्रभू शेळके, घनश्याम दरोडे, विनीत भोंडे! Bigg Boss मधील 3 बुटके सदस्य; काही लोकांची उंची का वाढत नाही?

Last Updated:
Bigg Boss Marathi Prabhu Shelke : बिग बॉस मराठीमधील प्रभू शेळके, घनश्याम दरोडे, विनीत भोंडे यांच्यासारखे आणखी काही लोक आहेत ज्यांचं वय वाढतं पण उंची वाढत नाही. बुटकेपणामागील कारणं काय आहेत, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
1/7
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन चांगलाच गाजतो आहे. सीझन सुरू झाल्या झाल्या प्रभू शेळके हा सदस्य चांगलाच चर्चेत आला. पहिल्याच दिवशी त्याने 'बिग बॉस' च्या घरात कल्ला केला. प्रभूची तब्येत, त्याची उंची आणि त्याचा चेहरा पाहिला तर तो एखादा लहान मुलगा वाटतो. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही तो 20 वर्षांचा आहे.

advertisement
2/7
प्रभूच नाही तर याआधी बिग बॉसमध्ये असे दोन बुटके सदस्य दिसले आहेत एक म्हणजे घनश्याम दरोडे आणि दुसरा म्हणजे विनीत भोंडे. यावेळी यांचं वय वाढलं पण उंची का वाढली नाही? असा प्रश्न पडतोच.

3/7
प्रभू शेळके असो, घनश्याम दरोडे आणि विनीत भोंडे यांच्यासारखे आणखी काही लोक बुटके आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चीनमधील यांग्सी गाव ज्याला बुटक्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. कारण इथं सगळेच लोक बुटके आहेत. लोक बुटके का होतात, उंची का वाढत नाही? यामागील नेमकं कारण काय?

4/7
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बुटकेपणा ही अशी वैद्यकीय अवस्था जिथे व्यक्तीची उंची सरासरीपेक्षा खूप कमी राहते. हा फक्त आजार नसून बहुतेक वेळा शारीरिक वाढीतील बदल असतो. यामागे अनेक कारणं आहेत.

5/7
एक कारण म्हणजे आनुवंशिक असू शकतं.  याचं सर्वात सामान्य कारण एक्नोनड्रोप्लासिया (Achondroplasia) नावाचा जीनमधील बदल आहे. हा बदल जन्मजात असतो किंवा पालकांकडून मिळू शकतो. यामुळे हाडांची वाढ नीट होत नाही, विशेषतः हात-पाय लहान राहतात.

6/7
दुसरं म्हणजे शरीरात वाढीचा हार्मोन कमी प्रमाणात तयार झाल्यास उंची वाढत नाही. हे बहुतेक वेळा पिट्यूटरी ग्रंथ नीट काम न केल्यामुळे होतं. अशा प्रकारात संपूर्ण शरीर प्रमाणात लहान दिसतं.

7/7
काही दुर्मिळ आजार, इतर जीन विकार, दीर्घकाळ कुपोषण, लहानपणी आजारपणामुळे वाढ थांबणं अशी काही इतर कारणंदेखील आहेत, अशी माहिती डॉ. खालिद जमील यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर दिली आहे.

What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement