पुन्हा कोरोना आला? JN1 व्हेरियंटमुळे वाढली चिंता; पण तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी, वाचा सविस्तर...

Last Updated:
कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी मृत्यूचेही प्रकार समोर आले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र IIT कानपूरचे...
1/9
 कोरोना महामारीने देशात आणि जगात प्रचंड उलथापालथ केली होती. या विषाणूमुळे आजही अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. आणि आता पुन्हा एकदा भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1 चर्चेत आला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि केरळ अशा काही राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.

advertisement
2/9
 बेंगळुरूहून एक दुःखद बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एका मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं सावट निर्माण होऊ लागलं आहे. पण या भीतीच्या वातावरणात कानपूर IIT कडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

3/9
 IIT कानपूरचे संचालक प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, “हो, कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे, पण आपल्या देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अजूनही खूपच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही.”

4/9
 ते पुढे म्हणाले, “जेव्हा रुग्णसंख्या कमी असते, तेव्हा कोणताही गणिती मॉडेल अचूक अंदाज देऊ शकत नाही. मात्र, मागील अनुभव सांगतो की, ही लाट फार काळ टिकणार नाही.”

5/9
 प्रोफेसर अग्रवाल यांच्या मते, सध्या जो व्हायरस पसरतोय तो ओमिक्रॉनचा एक नवीन सबव्हेरिएंट आहे. 2022 पासून आपण पाहतो आहोत की, अशा उपप्रकारांमुळे रुग्णसंख्या काही दिवस वाढते, पण मग ती हळूहळू कमीही होते. त्यामुळे त्यांनीही आश्वस्त केलं की या वेळीही तसंच होणार.

6/9
 दरम्यान, सरकारने सुद्धा यासंदर्भात सतर्कता जारी केली आहे. सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे.

7/9
 नागरिकांनाही काळजी घ्या, पण घाबरू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलं की, जर कुणाला सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मास्क घालणं, हात धुणं आणि गर्दी टाळणं अशा खबरदारी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.

8/9
 सारांश असा की, कोरोना पुन्हा एकदा दार ठोठावत आहे, पण या वेळी परिस्थिती फार गंभीर नाही. लसीकरणामुळे आणि आपल्या शरीरात तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे या लाटेचा परिणाम कमी होईल, असा विश्वास IIT कानपूरच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे. म्हणूनच, आपल्याला काळजी घ्यायची आहे, पण घाबरायचं नाही.

9/9
 सूचना: वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही वैद्यकीय मदत किंवा उपचार सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. News18Marathi किंवा लेखक याची जबाबदारी घेत नाहीत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement