Fishes Not To Eat : श्रावण संपला तरी हे 5 मासे खाऊ नका, चुकूनही खाल्लात तर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Fishes Not To Eat : मासे खाण्याचे फायदे असंख्य असले तरी असे मासे देखील आहेत जे शरीरासाठी खूप हानिकारक आहेत.
advertisement
मासे खाण्याचे फायदे असंख्य असले तरी असे मासे देखील आहेत जे शरीरासाठी खूप हानिकारक आहेत. बाजारात असे काही मासे उपलब्ध आहेत ज्यात पारा खूप जास्त प्रमाणात असतो. परिणामी ते मासे खाल्ल्याने पोटात पारा जमा होतो. ज्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. ते हृदयरोग, कोलेस्टेरॉल, कर्करोग आणि अगदी अर्धांगवायूचा धोका वाढवतं.
advertisement
advertisement
टूना : टूना माशात व्हिटॅमिन बी-3, बी-12, बी-6, बी-1, बी-2 आणि व्हिटॅमिन डीसारखे मल्टी-व्हिटॅमिन असतात. परंतु मॅकरेलप्रमाणे टूना माशात देखील पारा खूप जास्त असतो. म्हणून हा मासा खाल्ल्याने पोटात पारा जमा होतो आणि तुम्हाला गंभीर आजार होण्यास वेळ लागत नाही. याव्यतिरिक्त या सागरी माशांना हार्मोन्स आणि अँटीबायोटिक्स इंजेक्शन दिले जातात, ज्यामुळे शरीराला गंभीर नुकसान होतx.
advertisement
advertisement
advertisement
तिलापिया : जास्त मागणी असल्याने तिलापियाची शेती केली जाते. एकामागून एक शेतात मोठ्या प्रमाणात माशांची लागवड केली जाते. या माशांना सामान्य माशांप्रमाणे अन्न दिलं जात नाही तर बहुतेक प्रकरणांमध्ये पोल्ट्री शेणखत अन्न म्हणून दिलं जातं. ज्यामुळे त्यांच्या शरीरात रोगजनकांचे वहन होतं. शेतात शेती केलेल्या तिलापियापासून विविध जीवाणूजन्य आजार होऊ शकतात. जसं की स्ट्रेप्टोकोकस इनिया आणि कॉलमॅरिस रोग. तिलापिया माशांच्या शरीरात विविध कीटकनाशके आढळतात, ज्यामुळे मानवी शरीरात विविध गुंतागुंत निर्माण होतात. असे मासे खाल्ल्याने माणसांना हृदयरोग, अर्धांगवायू आणि दमा होऊ शकतो.
advertisement
तिलापिया माशांमध्ये प्रथिनांची पातळी खूप कमी असते आणि त्यांच्या शरीरात डायब्युटिलीन नावाचं एक प्रकारचं रसायन जमा होतें या डायब्युटिलीनमुळे दमा आणि ऍलर्जी होऊ शकते. तिलापिया मासे खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते. याव्यतिरिक्त तिलापिया माशांमध्ये डायऑक्सिन असते. शेती केलेल्या तिलापियाच्या शरीरात या डायऑक्सिनची पातळी 11 पट जास्त असते.
advertisement










