Famous Misal In Mumbai : अस्सल मालवणी मसाल्यांचा तडका, स्पेशल मटकी मिसळ मिळतेय मुंबईत इथं, किंमतही कमी!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मुंबईतल्या फास्टफूड संस्कृतीत मिसळ म्हटली की नागपुरी, कोल्हापुरी किंवा झणझणीत पुणेरी मिसळीचा उल्लेख सर्वात आधी होतो. कोकण स्पेशल मटकीची मिसळ आता मुंबईत मिळत आहे.
advertisement
advertisement
या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वाटाण्याऐवजी येथे मटकीचा वापर केला जातो. मटकी उकडून त्यात खोबरं-कांद्याचं वाटप, घरगुती मसाले आणि मालवणी मसाल्यांचा तडका दिला जातो. कोकणातील घराघरात बनणारी ही डिशच आता मुंबईतल्या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणचा स्वाद अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळते आहे.
advertisement
advertisement
या मिसळीची किंमत फक्त पन्नास रुपये ठेवण्यात आली आहे. परवडणारी किंमत आणि वेगळी चव यामुळे आसपासच्या परिसरातील ग्राहकांचा प्रतिसाद सकारात्मक मिळत आहे. स्टॉलचे वेळापत्रक दररोज सकाळी सात ते दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत असे आहे. जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकाजवळ जाणाऱ्यांसाठी हा नवा पर्याय ठरत आहे.