advertisement

Famous Misal In Mumbai : अस्सल झणझणीत कोकण मटकीची मिसळ फक्त 50 रुपयांत, मुंबईत इथं नक्की भेट द्या!

Last Updated:
मुंबईतल्या फास्टफूड संस्कृतीत मिसळ म्हटली की नागपुरी, कोल्हापुरी किंवा झणझणीत पुणेरी मिसळीचा उल्लेख सर्वात आधी होतो. कोकण स्पेशल मटकीची मिसळ आता मुंबईत मिळत आहे.
1/5
मुंबईतल्या फास्टफूड संस्कृतीत मिसळ म्हटली की नागपुरी, कोल्हापुरी किंवा झणझणीत पुणेरी मिसळीचा उल्लेख सर्वात आधी होतो. या पारंपरिक चवींपलीकडे जाऊन आता मुंबईकरांच्या जिभेवर एक नवा, हटके स्वाद चढत आहे. कोकण स्पेशल मटकीची मिसळ आता मुंबईत मिळत आहे.

2/5
जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनजवळ सागर आणि काजल या तरुण दाम्पत्याने सुरू केलेल्या स्टॉलवर ही मिसळ उपलब्ध आहे. सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेस हलक्याफुलक्या जेवणासाठी या स्टॉलवर चांगलीच गर्दी दिसते.

3/5
या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वाटाण्याऐवजी येथे मटकीचा वापर केला जातो. मटकी उकडून त्यात खोबरं-कांद्याचं वाटप, घरगुती मसाले आणि मालवणी मसाल्यांचा तडका दिला जातो. कोकणातील घराघरात बनणारी ही डिशच आता मुंबईतल्या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणचा स्वाद अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळते आहे.

4/5
सागर आणि काजल हे दोघेही मूळ कोकणातील आहेत. जवळपास दहा वर्षे त्यांनी प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी केली. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून स्थानिक परंपरा आणि चव पुढे न्यावी, या हेतूने त्यांनी कोकण स्पेशल मिसळ या उपक्रमाची सुरुवात केली.

5/5
या मिसळीची किंमत फक्त पन्नास रुपये ठेवण्यात आली आहे. परवडणारी किंमत आणि वेगळी चव यामुळे आसपासच्या परिसरातील ग्राहकांचा प्रतिसाद सकारात्मक मिळत आहे. स्टॉलचे वेळापत्रक दररोज सकाळी सात ते दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत असे आहे. जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकाजवळ जाणाऱ्यांसाठी हा नवा पर्याय ठरत आहे.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement