advertisement

सगळे म्हणाले नोकरी कर, पण मुंबईकर विशालनं निर्णय घेतला, आईची साथ अन् कमाई लाखात, काय केलं?

Last Updated:
Food Business: मेहनत, कौशल्य आणि सातत्य असेल तर कोणताही मराठी तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो” असे विशाल टिक्केकर सांगतो.
1/5
सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर काही तरुण उद्योग आणि व्यवसायात मोठं यश मिळवत आहेत. भांडुप (पूर्व) येथील तरुण उद्योजक विशाल टक्केकर यांनी ‘टेस्टी राइड’ हा फास्ट फूड सेंटर उभा केला आहे. एस.वाय.बी.कॉममध्ये अपयश आल्यानंतर कुटुंबाने त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. पण विशालने व्यवसायाचा मार्ग निवडत मोठं यश संपादन केलं.

2/5
“आपल्याकडे कोणी व्यवसाय केलेला नाही. व्यवसायात नुकसान झाले तर तू सावरू शकणार नाहीस” अशा भीतीमुळे घरच्यांनी विशालला उद्योजकतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र त्याची व्यवसाय करण्याची इच्छा पक्की होती. शेवटी या निर्णयात आईची साथ लाभली आणि तेच प्रवासातील निर्णायक वळण ठरले.

3/5
विशाल यांनी भांडुप स्टेशनच्या बाहेर एक छोटी जागा घेऊन सुरुवातीला फ्रँकी विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत कठीण होते. ग्राहक नव्हते आणि विक्रीही नव्हती. पण हात टेकण्याचा प्रश्नच नव्हता. सातत्य ठेवून ते रोज दुकान उघडत राहिले आणि काही दिवसांतच त्यांच्या चवीने ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात केली. हळूहळू ‘टेस्टी राइड’ची ओळख वाढू लागली आणि व्यवसायाची गाडी रुळावर आली.

4/5
आज विशाल फ्रँकीसोबतच बर्गर, सँडविच, मोमोज आणि इतर फास्ट फूड पदार्थही विकतात. ग्राहकांचा प्रतिसाद इतका उत्तम आहे. विशालची महिन्याला 1 लाखापर्यंत कमाई होते. व्यवसायाला आता सहा वर्षे पूर्ण झाली असून लॉकडाउनच्या कठीण काळातही हार मानली नाही. वर्षभर दुकान बंद राहिल्यानंतर सुरूवातीला स्वतः लोकांपर्यंत डिलिव्हरी देऊन व्यवसाय पुन्हा उभा केला.

5/5
विशेष म्हणजे आज विशालने दोघांना रोजगार देखील दिला असून याचा विशेष अभिमान आहे. “मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे अनेकजण म्हणतात पण ते चुकीचे आहे. मेहनत, कौशल्य आणि सातत्य असेल तर कोणताही मराठी तरुण यशस्वी उद्योजक होऊ शकतो” असे विशाल टिक्केकर सांगतो.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement