Iran US Conflict: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर इराणवर का झाला हल्ला? इस्त्रायलच्या राजदुताने अखेर सगळं सांगितलं
- Published by:Sachin S
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील आठवड्यात इस्त्राइलच्या दौऱ्यावर गेले होते. इस्त्रायलच्या दौऱ्यावर भारतात परतल्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर एकत्र हल्ला केला.
इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस युद्ध आणखी गंभीर होत चाललं आहे. विशेष म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील आठवड्यात इस्त्राइलच्या दौऱ्यावर गेले होते. इस्त्रायलच्या दौऱ्यावर भारतात परतल्यानंतर अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर एकत्र हल्ला केला. या सगळ्या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थितीत केले जात होते. पण आता भारतातील इस्रायलचे राजदूत रियुवेन अझर यांनी यावर खुलासा केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा दौरा आणि आमच्या 'ऑपरेशन अवसर'चा कोणताही संबंध नाही. पंतप्रधान मोदींचा दौरा संपल्यानंतर दोन दिवसांनी हे नियोजन करण्यात आलं होतं, असा खुलासा अझर यांनी केला.
इस्रायलच्या राजदुतांनी काय म्हटलं?
पंतप्रधान मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा झाली. देशाच्या परिस्थितीबद्दलही चर्चा झाली होती. पण, इराणवर कोणताही हल्ला करणार याची माहिती नव्हती. त्यावेळी हल्ल्याचं कोणतंही नियोजन नव्हतं. त्यामुळे त्याबद्दल काही सांगण्यासारखं नाही आणि कोणताही प्रश्नच उपस्थितीत होत नाही.
दौऱ्याच्या दोन दिवसांनी हल्ल्याचं नियोजन
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, "मोदींच्या दौऱ्यानंतर दोन दिवसांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी (28 फेब्रुवारी) सुरक्षा कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर संयुक्त कारवाई करण्यात आली. पंतप्रधान मोदी 25 आणि 26 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर इस्रायलमध्ये होते. हा त्यांचा 2017 नंतर दुसरा दौरा होता. 2017 चा दौरा भारत-इस्रायल संबंधांमध्ये ऐतिहासिक मानला जातो, ज्याने दोन्ही देशांच्या रणनीतिक संबंधांना नवी दिशा दिली होती. मोदी तेल अवीवहून परतल्यानंतर एक दिवसाने, 28 फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त मोहिमेत इराणच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
advertisement
खोमेनेईंचा मृत्यू
हल्ल्यानंतर काही तासांनी इराणनेही प्रत्युत्तर देत मिसाइल्सचा मारा केला. त्यातील अनेक मिसाईल्स दुबई, अबू धाबी, कतार आणि बहरीन या खाडी भागात पडल्या, त्यामुळे क्षेत्रातील तणाव वाढला. 28 फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात परिस्थिती सतत बिघडत आहे. इराणने आपल्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, आता चर्चा करण्यासाठी 'खूप उशीर' झाला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या, हल्ल्यात त्यांच्या मुली, जावई आणि नातीचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मंसुरा खोजस्तेह बाघेरजादेह यांचाही जखमी झााल्यामुळे मृत्यू झाला.
advertisement
दरम्यान,अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा हुसैनी खामेनेई यांना पुढील सर्वोच्च नेता बनवण्याची तयारी सुरू आहे. इराणच्या राजकीय वर्तुळात याला सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया मानली जातं. इस्रायल राजदूताच्या विधानानंतर हा मुद्दा अधिक संवेदनशील झाला आहे की, मोदींच्या दौऱ्याचा आणि हल्ल्याच्या वेळेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय संदेश गेला. इस्रायलने स्पष्ट केलं आहे की, हल्ल्याचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर आणि स्वतंत्रपणे घेतला गेला. सध्या, इराणच्या प्रत्युत्तर कारवाई आणि अमेरिका-इस्रायलच्या कडक भूमिकेमुळे पश्चिम आशियात परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. पुढील काही दिवसांत हा संघर्ष मोठ्या युद्धात बदलणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
Location :
Delhi,Delhi
First Published :
Mar 04, 2026 5:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर इराणवर का झाला हल्ला? इस्त्रायलच्या राजदुताने अखेर सगळं सांगितलं









