फक्त 14 हजारांच्या EMIवर Maruti Fronx खरेदी करायचीये? पाहा डाउन पेमेंट किती लागेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maruti Fronx Finance Plan: तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर तुम्हाला या गाडीचा ईएमआय प्लॅन आणि डाउन पेमेंटचं गणित करावं लागेल. चला याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
advertisement
advertisement
तुम्ही दिल्लीमध्ये ही गाडी खरेदी केली तर याच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 6.84 लाख रुपये आहे. गाडीच्या किंमतीत जवळपास 47,943 रुपयांचा RTO चार्ज आणि 37,961 रुपयांचा अंदाजे इन्शुरन्स जोडल्यानंतर याची एकूण ऑन-रोड किंमत जवळपास 7.77 लाख रुपये होते. जी शहर आणि डीलरशिपनुसार थोडी कमी-जास्त होऊ शकते.
advertisement
advertisement
गाडीचा पॉवरट्रेन कसा राहील? : Maruti Fronx तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही फ्यूल ऑप्शनसह खरेदी करु शकता. ज्यामुळे ग्राहक आपली गरज आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडू शकतात. तुम्हाला कमी खर्जात जास्त मायलेज हवे असेल तर सीएनजी ऑप्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. तसंच चांगला परफॉर्मेंस आणि स्मूथ ड्रायव्हिंगसाठी पेट्रोल व्हेरिएंट चांगला राहतो.
advertisement
ही कार दोन इंजिन ऑप्शनसह उपलब्ध आहे. पहिले 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 99 बीएचपी आणि 147.6 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन अधिक शक्तिशाली आहे आणि उच्च गती, हायवे ड्रायव्हिंग आणि ओव्हरटेकिंग दरम्यान चांगले काम करते, ज्यामुळे अधिक शक्तिशाली आणि स्पोर्टी ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. दुसरे 1.2-लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 89 बीएचपी आणि 113 एनएम टॉर्क निर्माण करते.









