नोकरी सोडून घेतला व्यवसाय करण्याचा निर्णय, पुण्यातील तरुण विकतोय सोड्याचे 40 प्रकार, PHOTOS

Last Updated:
अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. अशातच एका तरुणाने बंगळुरू येथील चांगली नोकरी सोडून सोडा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
1/6
व्यवसाय करणं हे अनेकांचे स्वप्न असतं. त्यामुळे अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून चांगला नफा मिळवत आहेत. अशातच एका तरुणाने बंगळुरू येथील चांगली नोकरी सोडून सोडा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता तरुण अगदी कमी जागेत म्हणजे 60 स्क्वेअर फूट जागेत हा व्यवसाय करत आहे.

advertisement
2/6
विशेष म्हणजे आता हा तरुण या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला चांगला नफा मिळवत आहे. पण त्याने हा व्यवसाय कसा सुरू केला, नोकरी सोडण्याचा विचार त्याच्या मनात नेमका कसा आला, याबाबत आपण जाणून घेऊयात.

3/6
 मोहित टेके असे या तरुणाचे नाव आहे. मोहित मूळचा <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्याचा</a> आहे. त्याने फूड या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले आणि बंगळुरू येथे दोन वर्षे नोकरी केली. मात्र, त्याठिकाणी त्याचे मन रमले नाही. यामुळे त्याने ती नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

4/6
पुण्यातील शनिवार वाडा शेजारी असलेल्या ठिकाणी त्याने स्ट्राँग सोडा शॉप सुरू केले आहे आणि या माध्यमातून तो महिन्याला 35 ते 50 हजार रुपये कमावत आहे. यामध्ये सोड्याचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत. लिंबू सरबत, मॉकटेल, फ्रेश सोडा असे सोड्याचे जवळजवळ 40 प्रकार तो तयार करत आहे. याची किंमत ही 20 रुपयापासून ते 50 रुपयांपर्यंत आहे.

5/6
लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले की, माझं शिक्षण हे बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे. लहानपणापासूनच बिझनेसची आवड होती व घरात आई वडिलांनाही व्यवसाय करताना पाहिलं होतं. मात्र, व्यवसाय करायचं म्हंटल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि ते नसल्यामुळे काही काळ बंगळुरू याठिकाणी मी नोकरी केली. मात्र, तिथे हवी तितकी प्रगती होईल, असे दिसत नव्हते. म्हणून मी पुन्हा पुण्याला शिफ्ट झालो.

6/6
यानंतर याठिकाणी स्वतःचा स्नॉग सोडा नावाचा ब्रँड सुरू केला. जवळपास दोन महिन्यांपासून मी हा व्यवसाय करत आहे. यामध्ये लिंबू, जलजिरा, पुदिना, कोकम, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, संत्री, सफरचंद, जिरा मसाला त्याचप्रमाणे मॉकटेल आणि फ्रेपे, सरबत असे एकूण 40 प्रकारचे सोडा पेय तयार केले जातात. यामधून चांगली कमाईसुद्धा होत आहे, अशी माहिती स्नॉग सोडा विक्रेते मोहित टेके या तरुणाने दिली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement