advertisement

Acidity, पोटातली जळजळ पूर्ण होईल बरी; जेवणात करा 5 भाज्यांचा समावेश

Last Updated:
उन्हाळ्यात अनेकजणांना अन्न सहज पचत नाही. शरिरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत असल्याने हा त्रास होतो. मग काहीजणांना ऍसिडिटी होते, तर काहीजणांच्या पोटात जळजळ होते. मग यावर उपाय फक्त भरपूर पाणी पिणं हा आहे का? तर नाही, यावर उपाय आहे सकस आहार घेणं, पोटाला पचेल असं साधं आणि घरचं जेवण जेवावं. या ऋतूत आहारात कोणत्या भाज्यांच्या समावेश असायला हवा, याबाबत डॉ. स्मिता श्रीवास्तव काय सांगतात जाणून घेऊया.
1/6
उन्हाळ्यात पचनसंस्था सुरळीत राहावी यासाठी आहारात कारल्याचा समावेश आवर्जून करा. ही भाजी चवीला जरी कडू असली तरी अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असते. आपण कारल्याचा रसही पिऊ शकता. त्यामुळेसुद्धा पाचनसंस्थेचं कार्य सुरळीत राहतं. विशेषतः गरोदर महिलांना कारलं खाण्याचा सल्ला दिला जातो.

2/6
दुधी थंड असते, त्यामुळे अर्थातच उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आयर्न, सोडियम, कॅल्शियम, फायबर आणि झिंक असतं. ज्यांमधून आरोग्याला भरभरून फायदे मिळतात. विशेषतः पचनसंस्थेचं कार्य व्यवस्थित राहतं. आपण दुधीची भाजी किंवा हलवा बनवून खाऊ शकता.

3/6
लालचुटूक टोमॅटो केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतं. यात पचनसंस्थेपयोगी अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाचं आरोग्य सुदृढ राहतं. आपण जेवणात टोमॅटो खातोच परंतु त्याचं सलाड बनवून खाल्लं तर उत्तम.

4/6
उन्हाळ्यातच नाही, तर सर्व ऋतूंमध्ये काकडीमुळे शरीर हायड्रेटेड राहतं. यात असणाऱ्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुरळीत राहते. शिवाय त्वचेसाठी, वजन कमी करण्यासाठी, इन्सुलिन कंट्रोल करण्यासाठी आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी काकडी उपयुक्त असते. आपण सलाडमध्ये काकडी खाऊ शकता.

5/6
 पालक भाजीला सूपर फूड म्हणतात. कारण या भाजीपासून शरिराला अनेक फायदे मिळतात. या भाजीमुळे पंचनसंस्था सुदृढ होतेच, शिवाय हृदयरोग, कर्करोग, <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/diabetes-patients-should-take-special-diet-in-summer-mhij-1172028.html">डायबिटीज</a>, स्थूलपणा, इत्यादी आजारांमध्ये ही भाजी उपयुक्त असते. यात भरपूर प्रमाणात <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/risk-of-eye-disease-increases-in-summer-know-how-to-take-care-mhij-1171840.html">व्हिटॅमिन्स</a> आणि <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/the-risk-of-heat-stroke-has-increased-take-care-of-yourself-mhij-1171823.html">मिनरल्स</a> असतात.
पालक भाजीला सूपर फूड म्हणतात. कारण या भाजीपासून शरिराला अनेक फायदे मिळतात. या भाजीमुळे पंचनसंस्था सुदृढ होतेच, शिवाय हृदयरोग, कर्करोग, डायबिटीज, स्थूलपणा, इत्यादी आजारांमध्ये ही भाजी उपयुक्त असते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात.
advertisement
6/6
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही माहिती म्हणजे एक वैयक्तिक मत आहे, आपण कोणत्याही पदार्थाचं औषध म्हणून सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही माहिती म्हणजे एक वैयक्तिक मत आहे, आपण कोणत्याही पदार्थाचं औषध म्हणून सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement