Health Benefits : खरबूज म्हणजे आरोग्याला केवळ फायदाच नाही, 'या' लोकांना होऊ शकतो मोठा त्रास

Last Updated:
प्रत्येक फळ सगळ्यांसाठी उपयुक्त असेलच असं नाही. खरबूज खाणं काही लोकांसाठी त्रासदायकही ठरू शकतं. चला तर मग पाहूया, कोणत्या परिस्थितीत खरबूज खाणं टाळावं.
1/10
उन्हाळा आला की बाजारात खरबूज दिसायला लागतात. पिवळसर-हिरव्या रंगाचं हे रसाळ फळ पाहताच तोंडाला पाणी सुटतं. खरबूज हे फक्त स्वादिष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
उन्हाळा आला की बाजारात खरबूज दिसायला लागतात. पिवळसर-हिरव्या रंगाचं हे रसाळ फळ पाहताच तोंडाला पाणी सुटतं. खरबूज हे फक्त स्वादिष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
advertisement
2/10
यामध्ये व्हिटॅमिन C, A, B6, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे शरीराला हायड्रेट ठेवतं, पचन सुधारतं, आणि त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.
यामध्ये व्हिटॅमिन C, A, B6, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे शरीराला हायड्रेट ठेवतं, पचन सुधारतं, आणि त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.
advertisement
3/10
पण प्रत्येक फळ सगळ्यांसाठी उपयुक्त असेलच असं नाही. खरबूज खाणं काही लोकांसाठी त्रासदायकही ठरू शकतं. चला तर मग पाहूया, कोणत्या परिस्थितीत खरबूज खाणं टाळावं
पण प्रत्येक फळ सगळ्यांसाठी उपयुक्त असेलच असं नाही. खरबूज खाणं काही लोकांसाठी त्रासदायकही ठरू शकतं. चला तर मग पाहूया, कोणत्या परिस्थितीत खरबूज खाणं टाळावं
advertisement
4/10
डायबेटिस असलेल्या लोकांनीखरबूजामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींनी हे फळ खूप मर्यादित प्रमाणातच खावं. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचं सेवन करावं. जास्त प्रमाणात खरबूज खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं.
डायबेटिस असलेल्या लोकांनी
खरबूजामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे डायबेटिस असणाऱ्या व्यक्तींनी हे फळ खूप मर्यादित प्रमाणातच खावं. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचं सेवन करावं. जास्त प्रमाणात खरबूज खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं.
advertisement
5/10
पचनसंस्था कमकुवत असेल तर...ज्यांना सतत गॅस, अपचन, पोट फुगणे यासारख्या तक्रारी असतात, त्यांनीही खरबूज खाणं टाळावं. यामधील फायबरमुळे अशा लोकांच्या पोटात गॅस किंवा ब्लोटिंग होऊ शकतं. विशेषतः उपाशीपोटी खरबूज खाल्ल्यास त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते.
पचनसंस्था कमकुवत असेल तर...
ज्यांना सतत गॅस, अपचन, पोट फुगणे यासारख्या तक्रारी असतात, त्यांनीही खरबूज खाणं टाळावं. यामधील फायबरमुळे अशा लोकांच्या पोटात गॅस किंवा ब्लोटिंग होऊ शकतं. विशेषतः उपाशीपोटी खरबूज खाल्ल्यास त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
6/10
एलर्जी असणाऱ्यांनी सावध राहावंकाही लोकांना खरबूज खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ, खाज, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन्स होऊ शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि भविष्यात खरबूज खाणं पूर्णतः बंद करावं.
एलर्जी असणाऱ्यांनी सावध राहावं
काही लोकांना खरबूज खाल्ल्यानंतर त्वचेवर पुरळ, खाज, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखे अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन्स होऊ शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि भविष्यात खरबूज खाणं पूर्णतः बंद करावं.
advertisement
7/10
खरबूजाचा स्वभाव थंड आहे. त्यामुळे सर्दी, घशात खवखव, सायनस किंवा श्वसनाचे त्रास असणाऱ्यांनी याचे सेवन टाळावं. हे खाल्ल्यानंतर संक्रमण वाढण्याची शक्यता असते आणि बरे होण्यास अधिक वेळ लागू शकतो.

8/10
ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी खरबूज खाणं धोकादायक ठरू शकतं. थंड तासीर असल्यामुळे ते श्वसनमार्गात आकुंचन निर्माण करू शकतं, ज्यामुळे श्वास घ्यायला अडचण येऊ शकते. त्यामुळे या आजारांमध्ये खरबूज खाणं टाळावं.

9/10
खरबूज हे जरी आरोग्यासाठी उपयुक्त असलं, तरी काही परिस्थितींमध्ये ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे कोणतंही फळ खाण्यापूर्वी आपलं आरोग्य, सध्याची तब्येत आणि वैद्यकीय स्थिती यांचा नीट विचार करा.

10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्दश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्दश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement