advertisement

Health Tips : कबुतरांमुळे होतो माणसाच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम! तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण..

Last Updated:
कबुतरं गॅलरीत येऊन घाण करतात. म्हणून आपण त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. मात्र कबुतरांमुळे आणखीही काही गंभीर त्रास होण्याची शक्यता असते. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील फुफ्फुस प्रत्यारोपण आणि श्वसन विकार तज्ञ, डॉ. राहुल केंद्रे यांनी सांगितले की, कबुतरांमुळे आपल्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. चला पाहूया कसा..
1/7
श्वसनाच्या समस्या : कबुतराच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. कबुतराची वाळलेली विष्ठा आणि सूक्ष्म पिसांमधून धूळ किंवा कण श्वानाद्वारे फुफ्फुसामध्ये गेल्याने श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवतात. विशेषत: ज्यांना अस्थमा किंवा ऍलर्जी असलेल्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास होऊ शकतो.

2/7
अतिसंवेदनशील न्यूमोनायटिस : कबुतराच्या विष्ठेच्या संपर्कात आल्याने अतिसंवेदनशीलता न्यूमोनिटिस (HP) म्हणून ओळखली जाणारी स्थिती निर्माण होऊ शकते. हा फुफ्फुसातील एक दाहक प्रतिसाद आहे, जो पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये आढळलेल्या सेंद्रिय धुळी कणांच्या वारंवार शासोच्छवासाद्वारे शरीरामध्ये घेतल्याने उद्भवतो.

3/7
कबुतराची वळलेली विष्ठा साफ करताना सूक्ष्म कण धुळीत रूपांतर होते, तेव्हा ते धूळ कण हवेत उडतात. या कणांमध्ये विविध बुरशीचे बीजाणू, जीवाणू आणि इतर सेंद्रिय पदार्थ असू शकतात. हे शरीरासाठी बाधा ठरू शकतात.

4/7
अतिसंवेदनशीलता न्यूमोनिटिसची लक्षणे बदलू शकतात. परंतु, अनेकदा खोकला, श्वास लागणे, ताप आणि थकवा येणे यांचा समावेश असू शकतो. सतत संपर्कात राहिल्यास ही लक्षणे कालांतराने मोठ्या प्रमाणात गंभीर होऊ शकतात.

5/7
जिवाणू संक्रमण : कबुतराच्या विष्ठेमध्ये ई-कोलाय, साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर यांसारखे जीवाणू असतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवतात. यामुळे बुरशीजन्य संसर्गही होऊ शकतो. हिस्टोप्लाझ्मा कॅप्सूलॅटम सारखी बुरशी, कबुतराच्या विष्ठेमध्ये आढळते, जेव्हा त्यांचे बीजाणू शवसनाद्वारे शरीरामध्ये आत घेतल्याने श्वसनाचे संक्रमण होऊ शकते.

6/7
परजीवी संसर्ग : कबुतराची पिसे आणि विष्ठेमध्ये पक्षांमध्ये आढळणारे किटाणू, पिसू आणि टिक्स यांसारखे परजीवी देखील असू शकतात, जे मानवांना रोग प्रसारित करू शकतात.

7/7
हे सर्व धोके लक्षात घेता, कबुतराच्या पिसांनी आणि विष्ठेमुळे दूषित झालेल्या भागाशी संपर्कात येताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, जसे की संरक्षक उपकरणे घालणे, प्रभावित भाग योग्यरित्या स्वच्छ करणे आणि निर्जंतुक करणे आणि संपर्कामुळे आरोग्य समस्या उद्भवल्याचा संशय असल्यास वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement