कुठूनही होऊ शकते नवी सुरूवात, फक्त हवी मनाची तयारी! आनंदी जीवनाचे 5 रहस्य
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल असंख्य लोकांचं आयुष्य प्रचंड बिझी म्हणजेच व्यस्त असतं. ज्यामुळे त्यांना भरपूर ताण आणि चिंतेचा सामना करावा लागतो. धोकादायक हे आहे की, लोक हा ताण, चिंता गांभीर्यानं घेत नाहीत. ज्यामुळे त्यांना गंभीर अशा नैराश्याचा म्हणजेच डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो. एवढी पुढची वेळ येऊ नये, यासाठी आजच काही चांगल्या सवयी लावून घेणं उत्तम. ज्यामुळे आपण आनंदी राहू शकता आणि शरीरही ऊर्जावान राहण्यास मदत मिळेल.
advertisement
योग्य विश्रांती : मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योग्य विश्रांती आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. त्यासाठी गरजेची असते आरामदायी जागा. आपण जिथं झोपतो तिथल्या दिव्यांचा रंग हलका असेल तर चांगली झोप लागते, असं मानसशास्त्र सांगतं. शिवाय झोप पूर्ण झाली तरच मेंदू आणि शरीर पुढील कामासाठी सक्रिय होतं. (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
चॉकलेट : अति गोड खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मात्र योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थांमधून गोडवा शरिरात जायलाच हवे. त्यामुळे शरिरातलं साखरेचं प्रमाण संतुलित राहू शकतं. चॉकलेटला मूड बूस्टर म्हणतात. जे खाल्ल्यावर शरीर त्वरित ऊर्जावान होतं. परंतु काही चॉकलेट फार गोड असतात, त्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण डार्क चॉकलेट खाऊ शकता पण प्रमाणात. (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
निसर्ग : आजूबाजूला झाडं असली, हिरवळ असली की मन शांत होतं. अर्थात रक्तदाबही नियंत्रणात राहतं. म्हणूनच आजारी व्यक्तीला लवकर बरं हो, असं सांगण्यासाठी भेटवस्तू म्हणून फुलं दिली जातात. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं हे आनंदी जीवनाचं एक रहस्य आहे. (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
योगा आणि व्यायाम : नियमित व्यायामाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला असंख्य फायदे मिळू शकतात. व्यायामामुळे शरिरात डोपामाइनसारखे हॉर्मोन्स वाढतात, जे नैराश्य आणि चिंतेवर नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. त्यामुळे जर आनंदी राहायचं असेल तर दररोज व्यायाम आणि योगा करणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : Canva)