आपण जी फळं खातो ती चेहऱ्यावर लावताच Glow येतो; कसा करावा वापर?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चेहऱ्यावर ग्लो यावा, पिंपल, डाग जाऊन चेहरा क्लीन दिसावा, यासाठी आपण बाजारातून वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट्स आणून वापरतो. काही प्रॉडक्टमध्ये असलेल्या केमिकल्समुळे त्वचा निस्तेज होऊ शकते. त्यापेक्षा आपण काही घरगुती उपायांनीही चेहऱ्यावर जबरदस्त ग्लो मिळवू शकतो. तज्ज्ञ मुकेश लोरा सांगतात की, आपण जी फळं खातो, तीच चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात. (काजल मनोहर, प्रतिनिधी / जयपूर)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आंब्यामुळे त्वचेवर तरुणपण येतं. यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे चेहऱ्याला अगदी टॉनिक मिळतं. आंब्याचा रस काढून त्यात दूध, सुंठ आणि चमचाभर तूप मिसळायचं. हे मिश्रण 1-2 महिने प्यायल्यास चेहऱ्यावर आकर्षक ग्लो येऊ शकतो. आंब्याच्या गरात चिमूटभर हळद मिसळून मसाज केल्यानेही चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
advertisement
लिंबात भरपूर व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे त्वचेतली घाण बाहेर पडते. डाग, पिंपल सर्वकाही स्वच्छ होतात. तर, डाळिंबात असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्माचाही त्वचेला फायदा होतो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.