मोबाईलचं व्यसन कसं सोडायचं? जबरदस्त उपाय, मग अजिबात कामाशिवाय वापरणार नाही!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईलचे फायदे अनेक आहेत, परंतु आपण त्याच्या आहारी गेलोय हेही खरंय. आजकाल एखादी व्यक्ती एकवेळ पर्स विसरली तर हरकत नसते, परंतु ती जर आपला मोबाईल विसरली तर मात्र अगदी कासावीस होते. मोबाईलचं हे व्यसन सोडवावं तरी कसं? याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
वाढलेल्या स्क्रीन टाइमचा परिणाम दृष्टीवरही होऊ शकतो. तसंच शरीरयष्टीवरही हा दुष्परिणाम दिसून येतो. पाठदुखी, मानदुखीचा त्रास होतो. तसंच लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे होणारे आजार उद्भवतात. महत्त्वाचं म्हणजे रिल्स शॉर्ट असल्यामुळे आपली एकाग्रता कमी होते. त्यामुळे ज्या कामांमध्ये एकाग्रता लागते तिथे लक्ष केंद्रित करता येत नाही. त्याचा दुष्परिणाम अभ्यासावर होतो.
advertisement
तज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही व्यसनमुक्तीसाठी उपाय एकच असतो की, त्याच्यापासून दूर जाणं. त्यामुळे काही दिवसांसाठी रिल्स नाही बघायचे असं ठरवणं म्हणजेच स्वत:ला डिजिटल डिटॉक्स करणं, सोशल मीडियाच्या वापरासाठी ठराविक वेळ ठेवणं, इत्यादी केल्यास मोबाईचं व्यसन सुटू शकतं. तसंच मन शांत राहण्यासाठी मेडिटेशन करावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.


