गॅस प्रॉब्लेममुळे चारचौघात होते फजिती? आता नो टेन्शन! 'या' पानांमुळे होईल पोट साफ
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. शिवाय आपल्या किचनमधले अनेक पदार्थही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. अगदी खायची पानंसुद्धा शरिरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. (संजय यादव, प्रतिनिधी)
advertisement
तुम्ही कधीतरी आजीकडे खायचं पान पाहिलं असेल. शिवाय अनेकजणांना गोड पान खायला आवडतं. तुम्हाला माहितीये का, हे पान औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असं. डॉ. अमित वर्मा सांगतात की, खायच्या पानांमध्ये प्रोटीन, लोह, खनिज, फायबर, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सीसह अनेक पोषक तत्त्व असतात. ही पानं सर्दी-खोकला, ब्लड शुगर आणि लघवीसंबंधित अनेक आजारांवर गुणकारी ठरतात.
advertisement
advertisement
advertisement
खायच्या पानांमुळे हाय ब्लड शुगर नियंत्रणात येते. त्यासाठी या पानांचा रस दररोज पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यात असणारे अँटीडायबिटिक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय सर्दी-खोकल्यादरम्यान श्वासासंबंधित काही त्रास झाल्यास खायच्या पानांवर मोहरीचं तेल लावून ही पानं तापवून छातीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हळूहळू सर्दीवर आराम मिळतो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.