ginger benefits : सांधेदुखीवर रामबाण उपाय, अद्रकचे आहेत खूपच फायदे

Last Updated:
प्राचीन काळापासून अद्रकाचा औषधी आणि मसाल्यातही वापर केला जात आहे. चहा आणि भाजीपाल्यात याचा वापर केला जातो. ग्रामीण भागात घरगुती उपचार म्हणूनही याचा वापर केला जातो. याचा वापर जेवणात चव वाढवण्यासाठी केला जातो. अद्रकचे मुख्य फायदे नेमके काय आहेत, हे आपण जाणून घेऊयात. (काजल मनोहर/जयपूर, प्रतिनिधी)
1/6
अद्रकचा प्रमुख वापर हा भाज्या, सूपमध्ये केला जातो. तसेच आजारी पडल्यावर अद्रकचा काढाही तयार करुन पितात. आयुर्वेदिक डॉ. पिंटू भारती यांनी याबाबत माहिती दिली.

advertisement
2/6
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, गर्भधारणा, प्रवास किंवा केमोथेरपी दरम्यान मळमळ कमी करण्यासाठी अद्रक फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीसुद्धा अद्रकचा फायदा होऊ शकतो.

3/6
अद्रकचे तेल अरोमाथेरेपीमध्येही वापरले जाते. यामुळे तणाव आणि थकवा दूर होतो. तसेच अनेक औषधींमध्ये याचा वापर केला जातो. याचा वापर केल्याने पोटदुखी, गॅस, सर्दी यांवर औषधी बनवली जातात, अशी माहिती डॉ. पिंटू भारती यांनी दिली.

4/6
यामुळे पचन सुधारते आणि भूकही वाढण्यास मदत होते. पोट फुगणे आणि अपचनासाठी अद्रक फायदेशीर आहे. घसा खवखवणे, खोकला आणि सर्दीपासून आल्याचा चहा किंवा काढा आराम देते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात, असेही त्यांनी सांगितले.

5/6
घरगुती उपचार - अद्रकच्या घरगुती उपचारबाबत त्यांनी सांगितले की, अद्रक, मध आणि लिंबू यांचे मिश्रण खोकला आणि घसादुखीसाठी फायदेशीर आहे. सांधेदुखीवर अद्रकची पेस्ट लावल्याने सूज कमी होते. तसेच लिंबू आणि अद्रकचे पाणी सकाळी लवकर जर पिले तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यासोबतच अद्रक सुकवून बनवलेली बडीशेप आयुर्वेदिक औषधे, पावडर आणि काढ्यात वापरली जाते, असेही त्यांनी सांगितले.

6/6
सूचना : या बातमीत देण्यात आलेली माहिती ही आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement