Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रूट शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी, नियमित खाल तर हे आजार जवळपण येणार नाहीत!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
ड्रॅगन फ्रूटचे सेवन नियमित केल्यास आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विविध पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असल्याने हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे.
advertisement
advertisement
advertisement
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे मधुमेह असलेल्या पेशंटना फायदा होतो. ड्रॅगन फ्रूटमध्ये फिनोलिक ॲसिड, फ्लायनाइड ग्लुटीन सारखे घटक असल्याने अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जे रुग्ण कॅन्सरशी झुंज देत आहेत. जे कॅन्सरने पीडित आहेत अशा रुग्णांनी ड्रॅगन फ्रूटच सेवन आवश्यक करावं.
advertisement
त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असल्यामुळे त्वचेशी निगडित रोग दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या देखील दूर होते. त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अपचन ॲसिडिटी बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर देखील हे फळ परिणामकारक आहे, असंही डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.