हिवाळ्यात पडते कोरडी त्वचा, शरीराचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी खोबरेल तेल लावताय? योग्य पद्धत कोणती पाहा

Last Updated:
हिवाळ्यात पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होते. अनेक जण तेव्हा खोबरेल तेल लावतात. पण, त्यानंतरही त्वचा लगेच कोरडी पडते. त्याने त्वचेला खोबरेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? ते जाणून घेऊ.
1/7
हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त चेहरा आणि हात पायाची काळजी घेतली जाते. पण, हिवाळ्यात तर पूर्ण शरीराची त्वचा कोरडी होते. मग पूर्ण शरीराच्या त्वचेचा ओलावा टिकून ठेवायचा आहे तर अनेक जण शरीराला खोबरेल तेल लावतात.

advertisement
2/7
तरीही काही वेळानंतर त्वचा कोरडी होते आणि आपल्याला रखरख वाटायला लागतं. मग शरीराचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दलचं त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.

3/7
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे आपल्या त्वचेला खाज सुटते आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी एकच सोपा आणि घरगुती उपाय आहे तो म्हणजे संपूर्ण शरीराला खोबरेल तेल लावणे.

4/7
पण खोबरेल तेल लावताना ते अंघोळ झाल्यावर ओल्या अंगावर लावावे. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितलं.

5/7
अंग कोरडे करून तेल लावल्यास ते दीर्घकाळ टिकत नाही. त्वचा कोरडी होऊन खाज सुटते. त्यामुळे खोबरेल तेल ओल्या अंगावर लावावे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही पॅराफीन असलेले, एलोवेरा असलेले मॉइश्चरायझर सुद्धा अंगाला लावू शकता. ते सुद्धा लावताना ओलसर अंगावर लावा.

6/7
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रॉडक्ट वापरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या नेहमी नेहमी उद्भवत नाहीत. हिवाळ्यात अंगाला खोबरेल तेल लावणे कधीही फायद्याचे आहे. त्याने त्वचा नरम राहते आणि उलत नाही, असे त्यांनी सांगितलं.

7/7
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement