BP Heart Attack : ब्लड प्रेशर किती वाढला की हार्ट अटॅक येतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
High Blood Pressure Cause Heart Attack : आजकाल हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. हृदयविकाराची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब. शरीरातील रक्तदाबात जास्त वाढ झाल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जर एखाद्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला छातीत वेदना, जळजळ किंवा घट्टपणा, पाठीच्या वरच्या भागात, छातीभोवती, दोन्ही हात, डोक्यात आणि पाठीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, जास्त घाम येणं किंवा मळमळ होत असेल तर तुम्ही सावध असलं पाहिजे. तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.