Somnath Temple : सोमनाथला कसं जायचं? जिथं PM मोदीही जाणार आहेत, मंदिराचा 1000 वर्षांचा इतिहास
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Go Somnath Temple : गुजरातमधील सोमनाथ मंदिरावरील आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 11 जानेवारीला सोमनाथला जाणार आहेत. तुम्हालाही इथं जायचं असेल तर ही संपूर्ण माहिती.
गुजरातमधील सोमनाथ मंदिर हे भारतातील केवळ एक प्राचीन तीर्थक्षेत्र नाही, तर अखंड श्रद्धा, सांस्कृतिक जिद्द आणि पुनरुत्थानाचे जिवंत प्रतीक मानलं जातं. 1026 साली सोमनाथवर पहिलं आक्रमण झालं होतं, याला 2026 मध्ये 1000 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 11 जानेवारीला सोमनाथला जाणार आहेत.
advertisement
advertisement
1026 मध्ये महमूद गझनवीच्या आक्रमणानंतर मंदिर उद्ध्वस्त झालं. पुढील शतकांमध्येही अनेक वेळा सोमनाथवर आक्रमणं झाली. मात्र प्रत्येक वेळी समाजाच्या सहभागातून आणि श्रद्धेच्या बळावर मंदिर पुन्हा उभं राहिलं. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने 1951 साली सध्याचं भव्य सोमनाथ मंदिर उभारण्यात आलं.
advertisement
advertisement
या 1000 वर्षांच्या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त केंद्र सरकारने 'सोमनाथ स्वाभिमान पर्व'अंतर्गत वर्षभर चालणारे सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांचा उद्देश केवळ इतिहासाचं स्मरण करणं नसून सोमनाथच्या पुनर्निर्माणामागील भारतीय समाजाची एकजूट आणि आत्मशक्ती अधोरेखित करणं हा आहे.
advertisement
advertisement
सोमनाथला जायचं असेल तर तुम्हाला विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे. तुमचा वेळ आणि बजेट पाहून तुम्ही ते निवडू शकता. सोमनाथ मंदिरात दर्शन मोफत आहे. अभिषेक किंवा विशेष पूजेसाठी 300 ते 1,500 पर्यंत शुल्क असू शकते. सण, सुट्ट्या आणि स्वाभिमान पर्वाच्या कार्यक्रमांच्या काळात खर्च वाढू शकतो.









