Tanning Removal Tips : कडक उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? टॅनिंग दूर करण्यासाठी 5 घरगुती उपाय ठरतील बेस्ट
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हामुळे अनेकदा त्वचा टॅन होऊन काळी पडते. एकदा त्वचा टॅन झाली की त्वचेवर चढलेला काळा रंग जाता जात नाही. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपायांचा वापर करून टॅनिंग घालवू शकता.
हळद आणि बेसनाचा पॅक लावून त्वचेचा टॅन सहज निघू शकतो. यासाठी दोन चमचे बेसन पीठ घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा गुलाबजल आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्या. मग टॅनिंग झालेली त्वचा पाण्याने स्वच्छ करून त्यावर ही पेस्ट लावून घ्या. 10 मिनिटे पेस्ट लावून ठेवा आणि मग धुवून टाका. तुम्ही हा पॅक दर दुसऱ्या दिवशी लावू शकता यामुळे त्वचेचे टॅनिंग दूर होते.
advertisement
advertisement
अधिकतर हात, पाय, मान आणि चेहऱ्याची त्वचा उन्हामुळे अधिक टॅन होऊ लागते. तेव्हा हे टॅन दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि हळद लावू शकता. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि हळदीत असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुण त्वचेची चमक परत आणण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही एका वाटीत थंड दही आणि एक चिमूटभर हळद घेऊन मिक्स करा. ही पेस्ट त्वचेवर साधारणपणे 20 मिनिटे लावा. तुम्ही आठवड्यातून दोनदा ही पेस्ट त्वचेवर लावू शकता.
advertisement
advertisement
कच्च दूध टॅनिंग दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. तुम्ही कच्च्या दुधात हळद आणि लिंबू मिक्स करून नॅचरल टॅन रिमूव्हर तयार करू शकता. याने टॅन झालेल्या जागेवर मसाज केल्याने त्वचेवरील टॅन दूर होते. दुधात नैसर्गिकपणे क्लींजिंग गुण आढळतात ज्यामुळे टॅन रिमूव्ह होऊ शकतो. (सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा त्वचेवर कोणतीही गोष्ट लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या, तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेणे आवश्यक आहे.)






