एकाकडे तर दागिने अन् वाहनही नाही..., या TOP 5 IAS अधिकाऱ्यांची संपत्ती किती माहितीये का?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अलीकडेच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला आहे. यामध्ये असे अनेक अधिकारी आहेत ज्यांच्या पत्नी या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांनी कर्ज घेतले आहे. पण यामध्ये सर्वात प्रसिद्ध आयएएस अधिकारी केके पाठक दागिने आणि कार यापैकी काहीही नाही. त्यामुळे बिहारमधील हे 5 टॉप अधिकाऱ्यांकडे किती संपत्ती आहे, ते जाणून घेऊयात. (सच्चिदानंद, प्रतिनिधी)
advertisement
आयपीएस अधिकारी डॉ. एस. सिद्धार्थ हे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे खूप जवळचे आणि कॅबिनेट विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्यांचा दिल्लीतील द्वारका येथे 25 लाख रुपयांचा फ्लॅट आहे. बँकेचे 90 लाख रुपयांचे कर्जही त्यांच्यावर आहे. तसेच बँक खात्यात 52.81 लाख आहेत. त्यांनी शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांना शस्त्रास्त्रांची आवड असल्याने त्यांच्याकडे एक पिस्तूल आणि एक कॅमेरा आहे.
advertisement
advertisement
ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव संजीव हंस यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीकडे जास्त मालमत्ता आहे. संजीव हंस यांच्याकडे होंडा सिटी कार, 306 ग्रॅम सोने, 0.9 कॅरेट हिरा आहे. मात्र, रोकड रक्कम फक्त 10 हजार रुपये आहे. तसेच बँकेत 87 हजार, म्युच्युअल फंडात 32.50 लाख आणि एफडीमध्ये 6.27 हजार लाख रुपये आहेत. मात्र, त्यांच्या पत्नीकडे 590 ग्रॅम सोने, 4 कॅरेट हिरा, 750 ग्रॅम चांदी, 30 हजार रुपये रोख, त्यांच्या बँक खात्यात 1.18 कोटी रुपये आणि 49 लाख रुपयांची एफडी आहे. यासोबतच पुण्यातही एक फ्लॅट आहे.
advertisement
advertisement