Tighten Jeans : न कापता-न शिवता टाईट करता येईल लूज जीन्स, 'या' टिप्सने चुटकीसरशी मिळेल परफेक्ट फिट!

Last Updated:
How to tighten jeans without sewing : जीन्स हे आपल्या अगदी रोजच्या वापरातील पोशाख आहे. मात्र अनेक वेळा आपली आवडती जीन्स थोडी लूज किंवा सैल होते. वजन कमी झाल्यावर कंबरेला जीन्स सैल वाटू लागते. अशावेळी न कापता किंवा शिवता जीन्स टाइट करण्याचे काही घरगुती आणि सोपे उपाय खूप उपयोगी ठरतात. सेफ्टी पिन, धागा, इलास्टिक किंवा स्क्रू बटण वापरून तुम्ही सहजपणे जीन्सला परफेक्ट फिट देऊ शकता.
1/7
लूज जीन्स टाइट करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सेफ्टी पिन आणि मजबूत धाग्याचा वापर. जीन्स आधी घालून बघा आणि ती कंबरेला किती लूज झाली आहे हे तपासा. आता बटन आणि बटनहोलच्या मधोमध एक छोटी सेफ्टी पिन लावा. नंतर पिनभोवती मजबूत धागा किंवा इलास्टिक गुंडाळा.

advertisement
2/7
धाग्याचे दोन्ही टोके ओढून सैल झालेला भाग एकत्र करा आणि मागच्या बाजूला एक मजबूत गाठ मारा. यामुळे जीन्स घट्ट होऊन व्यवस्थित फिट बसते. हा उपाय तात्पुरता असला तरी त्वरीत फिट मिळवण्यासाठी उत्तम आहे.

3/7
याशिवाय डबल बटण मेथड देखील खूप उपयुक्त ठरते. जीन्स एक ते दोन इंच लूज असल्यास हा उपाय अगदी प्रभावी आहे. सर्वप्रथम जीन्स घालून बघा आणि बटणाच्या रेषेत साधारण एक इंच आत फॅब्रिक हलकेसे दुमडून ठेवा.

4/7
ज्या जागी नवीन बटण बसवायचे आहे तिथे सेफ्टी पिन किंवा पातळ हुक वापरून एक तात्पुरते होल तयार करा. आता जीन्सचे मूळ बटण या नवीन होलमध्ये अडकवा. असे केल्याने जीन्स लगेच टाइट दिसू लागते.

5/7
आजकाल मार्केटमध्ये बिनाशिवणाचे स्क्रू बटण उपलब्ध असतात जे कमर टाइट करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. तुम्हाला ज्या जागी टाइटनेस हवी आहे तिथे जीन्समध्ये एक छोटेसे छिद्र करा. स्क्रू बटणाचा वरचा भाग छिद्रात घाला आणि मागील बेस लावून घट्ट करा.

6/7
हे नवीन स्क्रू बटण मूळ बटणाच्या जवळ एक अतिरिक्त लूप तयार करते, ज्यामुळे तुम्ही बटनहोल अधिक आतील बाजूला लावू शकता. अशाप्रकारे न शिवता आणि कापता तुम्ही तुमची लूज जीन्स टाईट बनवू शकता. याने तुम्हाला छान फिटेड लूक मिळतो.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement