Relationship : फोटोला लाईक करणे किंवा जुन्या क्रशला मेसेज करणं हे फसवणुकीत मोडतं का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is Cheating In Relationship : अनेकदा अनेकांच्या मनात विचार येतो की माझ्या मनात तर असं काहीच नाही मग असं असलं तरी आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक करतोय का? सोशल मीडियावर असं वागणं कितपत योग्य आहे?
आजच्या जगात प्रेम आणि विश्वास जितका प्रत्यक्ष आयुष्यात महत्त्वाचा आहे, तितकाच तो स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही आता टिकून आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बसलेले असता, पण दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये हरवलेले असता. अशातच जुन्या क्रशचा फोटो समोर येतो किंवा शाळेतल्या एखाद्या मैत्रिणीचा मेसेज येतो. मनात कोणतंही पाप नसतं, तरीही आपण तो मेसेज गुपचूप वाचतो किंवा त्या फोटोला 'Heart' ईमोजी देतो. पण हा साधा वाटणारा 'लाईक' अनेकदा सुखी संसाराला तडा देतो. पण अनेकदा अनेकांच्या मनात विचार येतो की माझ्या मनात तर असं काहीच नाही मग असं असलं तरी आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक करतोय का? सोशल मीडियावर असं वागणं कितपत योग्य आहे?
advertisement
advertisement
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला न सांगता एखाद्या व्यक्तीशी सतत चॅटिंग करता किंवा त्यांना तुमच्या आयुष्यातील खास गोष्टी शेअर करता, तेव्हा तुम्ही नकळत त्या व्यक्तीकडे भावनिकरित्या ओढले जाता. तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातील गोष्ट का सांगता? कारण तुम्ही त्याच्याशी भावनीकपणे जोडले जाता. याचाच अर्थ कुठेतरी तुम्ही जोडीदारासोबत चिटिंग करत आहात.
advertisement
'Psychology Today' मधील एका रिपोर्टनुसार, शारीरिक फसवणुकीपेक्षा 'Emotional Infidelity' (भावनिक फसवणूक) ही नात्यासाठी जास्त घातक असते. एखाद्या जुन्या क्रशला उशिरा रात्री मेसेज करणं किंवा त्यांच्या फोटोंवर सातत्याने कमेंट्स करणं हे सुरुवातीला निर्दोष वाटतं, पण ही एक प्रकारची 'डिजिटल फसवणूक' असू शकते.
advertisement
गुपचूप केलेले मेसेज म्हणजे धोक्याची लक्षणं?तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला एखादा मेसेज करताना तो पार्टनरपासून लपवावासा वाटत असेल, तर समजून जा की तिथे काहीतरी चुकतंय. जर तुमची मैत्री खरंच साधी असेल, तर ती लपवण्याची गरज काय? सुमारे 60 to 70% प्रकरणांमध्ये, मोबाईलमधील सिक्रेसीमुळेच पार्टनरच्या मनात संशयाची ठिणगी पडते. फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर कोणाच्या जुन्या फोटोंना लाईक करणं (Deep Liking) हे समोरच्या व्यक्तीला 'मी अजूनही तुझ्यावर लक्ष ठेवून आहे' असा सिग्नल देतं, जो तुमच्या सध्याच्या पार्टनरसाठी अपमानास्पद ठरू शकतो.
advertisement
विश्वासार्ह स्त्रोत काय सांगतात?प्रसिद्ध अमेरिकन थेरपिस्ट डॉ. कॅथी निकर्सन यांच्या मते, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला द्यायचा वेळ आणि लक्ष दुसऱ्या कोणाला तरी डिजिटल माध्यमातून देत असाल, तर तुम्ही तुमच्या नात्यातील ऊर्जेची चोरी करत आहात. अनेक 'Dating Apps' वर केवळ गप्पा मारण्यासाठी प्रोफाईल बनवणं हे देखील फसवणुकीच्या कक्षेत येतं, कारण तिथे तुमची नियत ही नवीन कोणाला तरी शोधण्याची असते.
advertisement
संवाद हाच एकमेव मार्गहे डिजिटल युग आपल्याला खूप जवळ आणत असलं तरी नात्यात पारदर्शकता असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मैत्री केवळ मैत्रीच आहे, तर त्याबद्दल जोडीदाराला कल्पना द्या. गुपचूप चॅटिंग करणं टाळा. शेवटी, एखादा 'लाईक' किंवा 'कमेंट' तुमच्या वर्षांनुवर्षांच्या विश्वासापेक्षा मोठा नक्कीच नसते.
advertisement










