Pregnancy Tips : उन्हाळ्यात गर्भवती महिलांनी असं राहा हायड्रेटेड, एक्सपर्टने सांगितले 6 हेल्दी ड्रिंक्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Healthy Summer Drinks In Pregnancy : गर्भधारणेचा काळ महिलांसाठी खरं तर खूप आनंदाचा आणि वेगवेगळे सुंदर अनुभव घेण्याचा काळ असतो. मात्र हीच गर्भधारणा जर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आली तर ती काहीशी त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच गर्भवती महिलेने उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे खूप गरजेचे असते. यासाठी महिला योग्य प्रमाणात पाणी पिण्यासोबतच विविध गोष्टींचे सेवन करतात. काही नैसर्गिक पेये गरोदरपणात उन्हाळ्यात जास्त प्रभावी मानली जातात. बाबा साहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज, दिल्लीच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती यादव त्यांनी या हेल्दी ड्रिंक्सबद्दल माहिती दिली आहे.
नारळ पाणी : डॉ. ज्योती यादव सांगतात की, उन्हाळ्यात गर्भवती महिलांसाठी पाण्याव्यतिरिक्त नारळपाणी हा उत्तम पर्याय आहे. याच्या नियमित सेवनाने शरीरातील पाणी तर भरून निघतेच पण आवश्यक पोषक तत्वेही मिळतात. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्ससह अनेक पोषक घटक असतात, जे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर असतात.
advertisement
फळांचा ज्यूस : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतात. पण फळांचा रस देखील एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात उपलब्ध पाण्याने भरलेली फळे जसे की, टरबूज इत्यादींचे सेवन करणे देखील गर्भवती महिलांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने अनेक पोषक तत्वे देखील मिळतात.
advertisement
advertisement
advertisement
भाज्यांचे ज्यूस : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी भाज्यांचे ज्यूस हा एक चांगला पर्याय आहे. काकडी आणि टोमॅटोसह अनेक उन्हाळी भाज्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात आढळते. पोषक तत्वांनी भरलेल्या या भाज्यांच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. इच्छा असल्यास या भाज्यांची कोशिंबीरही खाऊ शकता.
advertisement
advertisement








