Rat Control Tips : उंदीर येतात त्याठिकाणी हे फळ ठेवा, उंदीर घरातून पळून जातील; स्वस्त आणि प्रभावी उपाय
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
घरात उंदीर वाढले तर आपल्याला ते घराबाहेर काढणं खूप अवघड जातं. म्हणूनच उंदीर हाकलण्यासाठी विविध उपाय केले जातात. त्यासाठी वेगवेगळी औषधंही वापरली जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, जो वापरल्यास तुम्ही उंदराला न मारता घराबाहेर काढू शकता.
advertisement
advertisement
advertisement
त्यामुळे लोक उंदरांना विष देऊन मारण्यास कचरतात. घरात खूप साठा किंवा खूप वस्तू असतील तर लोक उंदीर मारण्याचा धोका पत्करत नाही. इतर लोक उंदरांसाठी सापळे लावतात. त्यानंतर उंदीर घराबाहेर काढले जातात. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, उंदरांना खास पद्धतीने घराबाहेर ठेवता येते. पण ही पद्धत फक्त नर उंदरांनाच लागू आहे. मादी उंदरांसाठी नाही.
advertisement
advertisement
कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठाच्या 2022 च्या अभ्यासात असे आढळून आले की, नर उंदीर केळीला घाबरतात. गेल्या वर्षी 20 मे रोजी 'सायन्स ॲडव्हान्सेस' या जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाला होता. त्यामुळे नर उंदीर घालावण्यासाठी केळीचा वापर केला जाऊ शकतो. गरोदर उंदरांच्या आसपास नर उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन्स का वाढतात याचे विश्लेषण करताना शास्त्रज्ञांनी हे शोधून काढले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


