मुंबईची तरूणी राजगड फिरायला गेली अन् बालेकिल्ला परिसरात असं काही घडलं की, सगळेच हादरले

Last Updated:

तरुणी अचानक घडलेल्या या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे:  वेल्हे – पर्यटकांची आवडती असलेल्या राजगडावर आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. बालेकिल्ला भागात फिरत असताना मुंबईतील एका पर्यटक तरुणीच्या डोक्यात अचानक दगड पडल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली. आपल्या सहकाऱ्यांसोबत राजगडावर पर्यटनासाठी आलेली ही तरुणी अचानक घडलेल्या या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या स्थानिक पहारेकऱ्यांनी तत्परता दाखवत धाव घेतली. कठीण कड्याकपारीचा मार्ग तुडवत त्यांनी जखमी तरुणीपर्यंत पोहोचून तिची प्राथमिक मदत केली. त्यानंतर तिला पायथ्यापर्यंत खाली आणण्यात या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

उपचारासाठी रुग्णालयात रवाना

दरम्यान, गंभीर अवस्थेत ॲम्बुलन्सची वाट न पाहता तिला खासगी वाहनातून लगेच उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वेल्हे आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्य देखील मदतीला तत्परतेने दाखल झाले. अशा संवेदनशील ठिकाणी वेळेवर केलेली मदत जखमी तरुणीसाठी जीवनदायी ठरल्याचे स्थानिकांनी सांगितले.
advertisement

सुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी

राजगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची भावना स्थानिक मंडळी व्यक्त करत आहेत.

नागपूर-उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग

नागपूर-उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही, 45 प्रवाशी थोडक्यात बचावले. नागपूर उमरेड मार्गावर VIT कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.यावेळी बसमध्ये एकूण ४५ प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने सर्वजण वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चालकाने तातडीने बस थांबवत आणि प्रवाशांना बाहेर काढले, काही क्षणांतच बसने पेट घेतला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात यश आले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. प्रवाशांमध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. घटनेची अधिक तपास कुही पोलिस तपास करत आहे.  घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईची तरूणी राजगड फिरायला गेली अन् बालेकिल्ला परिसरात असं काही घडलं की, सगळेच हादरले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement