Dal Cooking Tips : डाळ शिजवताना फेस का येतो? तो काढणं गरजेचं आहे की नाही? 99 टक्के गृहिणींना हा गैरसमज

Last Updated:
आपण डाळ कुकरमध्ये लावतो किंवा पातेल्यात शिजवतो, तेव्हा वरच्या बाजूला साचणारा तो पांढरा फेस नक्की काय आहे? तो काढला पाहिजे की तसाच राहू द्यावा? याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. चला तर मग, विज्ञानाच्या नजरेतून आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून या 'फेसाचं' रहस्य उलगडूया.
1/9
भारतातील बहुतांश घरात भात-डाळ हे नेहमीचं आणि कंफर्ट फूड मानलं जातं. त्याच्याशिवाय जेवण पूर्णच झाल्यासारखं वाटत नाही. भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने डाळ बनवली जाते. पण डाळ ही सर्वांना लागतेचय शिवाय डाळ ही आरोग्यासाठी खूपच पौष्टिक आहे. पण डाळ शिजवताना एक गोष्ट प्रत्येक गृहिणींना खटकते आणि त्याबद्दल अनेक प्रश्न देखील आहेत. ते म्हणजे डाळ शिजवताना त्यावर येणारा फेस.

advertisement
2/9
आपण डाळ कुकरमध्ये लावतो किंवा पातेल्यात शिजवतो, तेव्हा वरच्या बाजूला साचणारा तो पांढरा फेस नक्की काय आहे? तो काढला पाहिजे की तसाच राहू द्यावा? याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. चला तर मग, विज्ञानाच्या नजरेतून आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून या 'फेसाचं' रहस्य उलगडूया.
आपण डाळ कुकरमध्ये लावतो किंवा पातेल्यात शिजवतो, तेव्हा वरच्या बाजूला साचणारा तो पांढरा फेस नक्की काय आहे? तो काढला पाहिजे की तसाच राहू द्यावा? याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. चला तर मग, विज्ञानाच्या नजरेतून आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून या 'फेसाचं' रहस्य उलगडूया.
advertisement
3/9
भारतीय जेवणात 'वरण-भात' किंवा 'डाळ' नसेल तर जेवण अपूर्णच वाटतं. मग ती तूर डाळ असो, मूग डाळ किंवा मसूर. डाळ शिजवायला ठेवली की काही मिनिटांतच वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा फेस साचायला सुरुवात होते. जुन्या काळी आपली आजी किंवा आई पातेल्यात डाळ शिजवताना हा फेस आवर्जून काढून टाकायची. पण आजच्या धावपळीच्या युगात आपण 'शॉर्टकट' म्हणून थेट कुकरमध्ये डाळ लावतो, जिथे हा फेस काढण्याची संधीच मिळत नाही. पण हा फेस नक्की येतो कुठून?

4/9
डाळीत फेस येण्यामागे मुख्यत्वे दोन शास्त्रीय कारणं आहेत:

5/9
1. सॅपोनिन (Saponins): डाळींच्या बाहेरील आवरणात नैसर्गिकरित्या 'सॅपोनिन' नावाचा घटक असतो. जेव्हा डाळ गरम पाण्यात उकळते, तेव्हा हे सॅपोनिन साबणासारखा फेस तयार करतात. हे एक प्रकारचे नैसर्गिक संरक्षण असते जे झाडांना किडींपासून वाचवते.2. प्रथिने (Proteins): डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. जेव्हा पाणी उकळते, तेव्हा या प्रथिनांचे रेणू हवेच्या संपर्कात येऊन फेसाच्या स्वरूपात वर येतात.

6/9
आता महत्त्वाचा प्रश्न हा फेस काढून टाकावा का? याचे उत्तर 'हो' असे आहे. याची काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत:शास्त्रज्ञांच्या आणि आयुर्वेदाच्या मते, हा फेस शरीरात 'यूरिक ॲसिड' (Uric Acid) वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. यूरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी किंवा गाउट सारखे त्रास उद्भवू शकतात.

अनेक महिलांना तक्रार असते की डाळ खाल्ल्यावर पोट फुगते किंवा गॅस होतो. डाळीवरील फेसात 'अँटी-न्यूट्रिएंट्स' असतात, जे पचनात अडथळा निर्माण करतात. हा फेस काढून डाळ शिजवल्यास पचनाच्या समस्या कमी होतात. फेसामुळे डाळीची मूळ चव थोडी कडवट वाटू शकते. फेस काढून शिजवलेली डाळ अधिक चविष्ट आणि दिसायला चांगली लागते.
आता महत्त्वाचा प्रश्न हा फेस काढून टाकावा का? याचे उत्तर 'हो' असे आहे. याची काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत:शास्त्रज्ञांच्या आणि आयुर्वेदाच्या मते, हा फेस शरीरात 'यूरिक ॲसिड' (Uric Acid) वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. यूरिक ॲसिड वाढल्यामुळे सांधेदुखी किंवा गाउट सारखे त्रास उद्भवू शकतात.अनेक महिलांना तक्रार असते की डाळ खाल्ल्यावर पोट फुगते किंवा गॅस होतो. डाळीवरील फेसात 'अँटी-न्यूट्रिएंट्स' असतात, जे पचनात अडथळा निर्माण करतात. हा फेस काढून डाळ शिजवल्यास पचनाच्या समस्या कमी होतात. फेसामुळे डाळीची मूळ चव थोडी कडवट वाटू शकते. फेस काढून शिजवलेली डाळ अधिक चविष्ट आणि दिसायला चांगली लागते.
advertisement
7/9
योग्य पद्धत काय?जर तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर डाळ शिजवताना या काही टिप्स फॉलो करा:
1. डाळ शिजवण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे सॅपोनिनचे प्रमाण कमी होते.
2. डाळ थेट कुकरमध्ये न लावता, आधी पातेल्यात पाणी घालून उकळा.
3. उकळी आल्यावर वर साचलेला सर्व पांढरा फेस चमच्याने काढून टाका.
4. फेस पूर्णपणे काढून झाल्यावरच कुकरचे झाकण लावा किंवा पातेल्यात डाळ शिजवा.
योग्य पद्धत काय?जर तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर डाळ शिजवताना या काही टिप्स फॉलो करा:1. डाळ शिजवण्यापूर्वी किमान ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे सॅपोनिनचे प्रमाण कमी होते.2. डाळ थेट कुकरमध्ये न लावता, आधी पातेल्यात पाणी घालून उकळा.3. उकळी आल्यावर वर साचलेला सर्व पांढरा फेस चमच्याने काढून टाका.4. फेस पूर्णपणे काढून झाल्यावरच कुकरचे झाकण लावा किंवा पातेल्यात डाळ शिजवा.
advertisement
8/9
तुमच्या रोजच्या गडबडीच्या जीवनात ही छोटीशी सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आजपासूनच 'फेसमुक्त' डाळ शिजवायला सुरुवात करा

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement