हिवाळा स्पेशल सुरण कंदाची भाजी, आरोग्यासाठी गुणकारी, सोप्या पद्धतीने बनवा रेसिपी

Last Updated:
हिवाळ्यात अनेक लोकांना वाताची समस्या उद्भवते. त्यासाठी अमरावतीमधील काही भागांत सुरण कंदाची भाजी खातात. अनेकदा डॉक्टरांकडून सुद्धा ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो.
1/7
हिवाळ्यामध्ये अनेकांना वात ही समस्या उद्भवते. त्यामुळे अमरावतीमधील काही भागांत हिवाळ्यात सुरण कंदाचे सेवन केले जाते. सुरण कंद हा दोन प्रकारचा असतो एक गावरान आणि दुसरा जंगली. जंगली सुरण कंद हा खाण्यासाठी वापरत नाहीत. त्याचा उपयोग फक्त औषधी म्हणून केला जातो. गावरान सुरण कंद हा हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी वापरतात. प्रत्येक भागांत याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. अमरावती स्पेशल सुरण कंदाची भाजी कशी बनवतात? याबद्दल गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी माहिती दिली आहे.

advertisement
2/7
अमरावती मधील गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी सांगितल्यानुसार, सुरण कंदाची भाजी बनवताना सर्वात आधी कंद धुवून घ्यायचा. त्यानंतर त्याला कोरडा करून त्याचे दोन भाग करायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे सुरण कंद कापायला घेतला की हात खाजवतात. त्यामुळे हाताला तेल लावावे किंवा मग हातात पॉलिथिन सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर सुरण कंदाची वरची साल पूर्ण काढून घ्यायची आणि त्याचे चिप्स करून घ्यायचे आहे. चिप्स हे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही . मिडीयम साईजमध्ये चिप्स करून घ्यायचे आहे. ते चिप्स दिवसभर घरातच वाळत ठेवायचे आहे. एकदम कडक वाळवून घ्यायचे नाही. कडक जर वाळवून घेतले तर चिप्स जळतात.

3/7
सुरण कंदाची भाजी बनवायला लागणारे साहित्य : कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट, काजू आणि शेंगदाण्याची पेस्ट, लसूण जिरे, कोथिंबीरची पेस्ट, टोमॅटो आणि पालकाची पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, धनी पावडर, सावजी मसाला तेल आणि सुरण कंदाचे चिप्स हे साहित्य लागते.

4/7
सुरण कंदाची भाजी बनवण्यासाठी कृती : सर्वात आधी चिप्स तळून घ्यायचे आहे. चिप्स हे मंद आचेवर लाल होतपर्यंत तळून घ्यायचे. एकदम करपू सुद्धा द्यायचे नाही आणि कच्चे सुद्धा ठेवायचे. चिप्स जर कच्चे राहले तर जिभेला थोड चरचर वाटते. त्यामुळे चांगले तळून घ्यायचे.

5/7
त्याच तेलात तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता. सर्वात आधी तेलात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची. ते परतवून घ्यायची आणि थोडी लाल होऊ द्यायची. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घालायची ती थोडी शिजू द्यायची. काजू आणि शेंगदाण्याची पेस्ट घालायची ती सुद्धा थोडी परतवून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट आणि इतर मसाले घालायचे. ते सुद्धा थोडा वेळ शिजू द्यायचे. टोमॅटो आणि पालक पेस्ट घालायची त्यानंतर हा मसाला तेल सोडत पर्यंत शिजून घ्यायचा आहे. त्यात लागत असेल तर थोडे पाणी घालू शकता.

6/7
मसाला तयार झाला की, त्यात चिप्स घालायचे. ते परतवून घ्यायचे. तुम्ही यात रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी सुद्धा वापरू शकता. त्यामुळे भाजी आधिक टेस्टी बनते. त्यात पाणी घालून घ्यायचे. तुम्हाला हवा तसा रस्सा तुम्ही बनवू शकता पातळ पाहिजे असल्या जास्त पाणी घाला. त्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून उकळी काढून घ्या.

7/7
उकळी आली की, सुरण कंदाची भाजी तयार होते. नंतर त्यात कोथिंबीर घालून घ्या. झणझणीत अशी सुरण कंदाची भाजी तयार आहे. ही भाजी भाकरी सोबत आणखी छान लागते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement