Mutton Recipe: अस्सल कोल्हापुरी मटण, एकदम झणझणीत रस्सा, रेसिपी जबरदस्त!

Last Updated:
Kolhapur Mutton: काहीजण आठवड्याचे सर्व दिवस मांसाहार आवडीनं करतात, तर काहीजण आतड्यातून काही ठराविक दिवशीच मांसाहारी पदार्थांवर ताव मारतात. परंतु रविवारी मात्र सर्वजण आवडीनं चिकन, मटण, मासे, अंडी खातात. परंतु तोच तोच रस्सा आणि सुका बेत कधीपर्यंत करायचा. आज आपण अस्सल कोल्हापुरी मटणाची एकदम झणझणीत रेसिपी पाहणार आहोत, हे मटण खाऊन सर्वजण बोटं चाटतच बसतील.
1/7
कोल्हापूरचा तांबडा, पांढरा रस्सा म्हटलं की, मांसाहारप्रेमींच्या तोंडाला आपसूक पाणी सुटतं. तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी कोल्हापुरी स्टाईलचं मटण बनवू शकता.

advertisement
2/7
जर अर्धा किलो मटण असेल तर त्यासाठी 2 चमचे तेल, 2 बारीक चिरलेले कांदे, 6-7 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घ्यायचा. तसंच...

3/7
घरी बनवलेला कोल्हापुरी मसाला नसेल तर विकत घ्यायचा. त्याचे 2-3 चमचे, तिखट मसाला आवडीनुसार, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि कपभर पाणी घ्यायचं.

4/7
घरी कोल्हापुरी मसाला बनवायचा असेल तर दालचिनीचा 1 इंच तुकडा, लवंग 2-3, वेलची 2, काळीमिरी 5-6, तिळ 1 चमचा, सुकं नारळ 1/4 कप, गरम मसाला 1/2 चमचा, धणे 1 चमचा, जिरे 1 चमचा, कोथिंबीर 1 चमचा पेस्ट. मसाला बनवताना सर्व मसाले एकत्र करून मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची.

5/7
आता मटण बनवण्यासाठी सर्वात आधी मटण साफ धुवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून चांगलं परता.

6/7
टोमॅटो घालून पुन्हा व्यवस्थित परता. हळद, मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर आणि कोल्हापुरी मसाला घाला, आता सर्व मसाले परतून घ्या. त्यात मटण घालून 5-10 मिनिटं शिजूद्या.

7/7
मटणावर पाणी घालून मीठ घाला आणि झाकण ठेवून मटण पूर्णपणे शिजूद्या. साधारण 30-40 मिनिटं मध्यम आचेवर मटण शिजायला ठेवा. त्यानंतर तुमचं झणझणीत कोल्हापुरी मटण तयार होईल. वरून मस्तपैकी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement