advertisement

Summer Tips : असं निवडा भरपूर पाण्याचं शहाळं; 99% लोक खरेदीच्यावेळी करतात ही चूक

Last Updated:
How To Choose Watery Coconut : कडक उन्हात शहाळ्याचं पाणी प्यायल्याने शरीराला जी, तृप्ती मिळते. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. म्हणूनच वाढत्या तापमानामुळे नारळांच्या मागणीत वाढ होते. याचसोबत त्यांच्या किमतींमध्ये वाढ होते. मात्र प्रत्येक शहाळ्यामधे तितकेच पाणी निघेल याची खात्री नसते. म्हणून आपला कल चांगले आणि जास्त पाणी असलेले शहाळे घेण्याकडे असतो. यासाठीच काही टिप्स देणार आहोत.
1/5
उन्हाळ्यात तुम्हाला फ्रेश आणि सर्वाधिक हायड्रेटेड राहण्यासाठी नारळाचे पाणी उत्तम असते. चांगल्या शहाळ्यासाठी तुम्हाला फक्त पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्याची गरज आहे. याद्वारे तुम्ही उच्च पाण्याचे प्रमाण असलेले चांगले नारळ स्वतः खरेदी करू शकाल.

2/5
शहाळं हलवून पाहा : खरेदी करण्यापूर्वी एक नारळ घ्या आणि ते व्यवस्थित हलवून पाहा. यातून पाण्याचा खळखळ आवाज आला तर समजून जा, त्या नारळामध्ये पाणी कमी आहे. याउलट, पाण्याचा खूप कमी आणि अगदीच आवाज न आल्यास, त्या नारळामध्ये भरपूर पाणी असते. बऱ्याच लोकांना वाटते जास्त आवाज आला म्हणजे नारळात जास्त पाणी आहे.

3/5
नारळाचा आकार पाहा : सरासरी आकाराचे नारळ निवडा. खूप मोठा किंवा खूप लहान नाही. नारळ मोठा असेल तर त्यात पाणी जास्त असेल असे समजू नका. असे घडत नाही. जास्त मोठ्या नारळात मलाई जास्त असते, जी पाण्यापासूनच बनते. त्यामुळे त्यात पाणी कमी होते. म्हणूनच माध्यम आकाराचे नारळ निवडा.

4/5
हिरवा रंग : काही नारळांवर गडद तपकिरी डाग दिसू शकतात याचा अर्थ ते लवकरच सुकणार आहेत. या नारळांमध्ये कमी पाणी असते. म्हणून चमकदार हिरवा रंग असलेले नारळ निवडा. कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.

5/5
ही गोष्ट लक्षात ठेवा : शहाळं खरेदी करून ताजे पाणीच प्या. असे केल्यासच तुम्हाला पाण्यात असलेल्या सर्व पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा होईल. जास्तवेळ नारळ तसेच ठेवल्याने त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊ शकते.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement