डाळ शिजवताना अशी चूक झाली तर तुम्ही दाखल होऊ शकता हॉस्पिटलमध्ये, कारण...
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
कोणतंही अन्न शिजवताना ते आरोग्यासाठी हितकारक, पौष्टिक कसं असेल, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक पदार्थ शिजवण्याची ठरावीक पद्धत असते. डाळ, तांदूळ शिजवण्यापूर्वी धुतले जातात; पण या डाळीवर दिसणाऱ्या फेसाचं काय? तो ठेवायचा की टाकून द्यायचा, असा प्रश्न अनेकांना पडतो.
भारतीय आहारात डाळ हा खूप महत्त्वाचा घटक आहे. भारतीय अन्नपदार्थांमधला हा मध्यवर्ती घटक आहे. भारतातल्या जवळपास प्रत्येक घरात रोज वेगवेगळ्या पद्धतीनं डाळ शिजवली जाते. मग डाळीचं शिजलेलं वरण कोणाकडे आमटीच्या स्वरूपात चपातीबरोबर, तर कोणाकडे भाताबरोबर खाल्लं जातं. शरीराला आवश्यक असणारी प्रोटीन्स डाळीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे डाळीला जी उत्तम चव असते त्यापेक्षाही ती आरोग्यासाठी किती तरी फायदेशीर असते.
advertisement
advertisement
जेव्हा कुकरऐवजी एखाद्या उघड्या पातेल्यात डाळ शिजवली जाते, तेव्हा लक्षात येईल की त्यावर येणारा फेस हा सॅपोनिन्सने बनलेला असतो. एका ऑनलाइन अहवालानुसार, डाळींमध्ये सॅपोनिन्स हे ग्लायकोसाइड्स असतात. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ते पाण्यात मिसळू लागतात. या सॅपोनिन्समध्ये साबणासारखे गुण असतात. पाण्याला उकळी आल्यानंतर हवा त्यात शिरते आणि त्याचा फेस तयार होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चिकन उकळलं जात असताना त्यावर येणाऱ्या फेसाला स्कम असं म्हणतात. हे आपल्या आरोग्यासाठी अयोग्य असतं. मांसातून निघालेलं आणि हाडावर साचलेलं प्रोटीन यामध्ये असतं. हे एक प्रकारचं अन्नातलं प्रोटीनच असतं, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळं ते हानिकारक नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे; पण तरीही यात काही प्रमाणात फॅट आणि हाडांचे बारीक कण असू शकतात. चिकनपासून तयार होणारा पदार्थ आणि त्याची चव याच्यावर त्याचा परिणाम होत असतो.