Sprouted Potato : कोंब आलेले बटाटेही चांगले, आहेत 5 फायदे; फक्त वापरण्याची पद्धत बदला

Last Updated:
Sprouted Potato : कोंब आलेले बटाटे खाऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. पण हे बटाटे फेकूही नयेत. ते वेगळ्या पद्धतीने वापरले तर या बटाट्यांचे खूप फायदे आहेत.
1/7
तुम्ही कुठेही जा बटाटा प्रत्येक घरात असतो. बटाट्याची भाजी असो वा आणखी काही, बटाट्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बटाटाच्या बाबतीत तुम्ही एक गोष्टी पाहिली असेल की बटाट्यांना कोंब येतात आणि ते वापरायचे असतील तर आपण ते काढतो आणि मग वापरतो. पण असे कोंब आलेले बटाटे खाऊ नयेत, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

advertisement
2/7
कृषी तज्ज्ञांच्या मते, बटाटे जास्त काळ प्रकाश, उष्णता किंवा दमट वातावरणात ठेवले गेले तर त्यांच्यात नैसर्गिकरित्या काही विषारी घटक तयार होऊ लागतात. या घटकांना ‘ग्लायकोअल्कलॉइड’ असं म्हटलं जाते. त्यामध्ये सोलानाइन आणि चाकोनाइन हे दोन घटक विशेषतः घातक मानले जातात. बटाट्याचा रंग हिरवट होणे किंवा त्याला अंकुर फुटणं म्हणजे त्यामध्ये या विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढल्याचं लक्षण असतं.

3/7
अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम काही तासांतच दिसून येऊ शकतात. सुरुवातीला पोटात जडपणा, जळजळ आणि मळमळ जाणवते. त्यानंतर उलट्या, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना चक्कर येणे, डोकेदुखी आणि तीव्र अशक्तपणा जाणवतो. गंभीर परिस्थितीत ताप येणे, शरीरातील पाणी कमी होणे तसेच मज्जासंस्थेवर परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आजार असलेल्या लोकांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरतो.

4/7
अनेकांना असं वाटतं की बटाटे उकळून, तळून किंवा नीट शिजवून घेतल्यास त्यातील विषारीपणा नष्ट होतो. मात्र, हा एक मोठा गैरसमज आहे. सोलानाइनसारखी विषारी संयुगे उच्च तापमानातही पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्यामुळे शिजवलेले असले तरी अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे आरोग्यास हानीकारक ठरू शकतात. म्हणूनच पोषणतज्ज्ञ आणि डॉक्टर असे बटाटे वापरण्याचा सल्ला देत नाहीत.

5/7
पण याचा अर्थ तो बटाटा फेकायचा असंही नाही. कोंब आलेल्या बटाटे खाऊ शकत नाही पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. कोंब म्हणजेच पुढचं झाड तुम्ही घरच्या घरी नवे बटाटे उगवू शकता. बटाटा 2–3 तुकड्यांत कापा. प्रत्येक तुकड्यावर कोंब असू द्या.1 दिवस सावलीत वाळवा. मातीमध्ये 3–4 इंच खोल लावा 2–3 महिन्यांत बटाटे मिळतात.

6/7
दुसरं म्हणजे तुम्ही कंपोस्ट खतासाठी याचा वापर करू शकता. स्वयंपाकघरातील ओला कचरा असल्यास बटाटा लहान तुकड्यांत कापून कंपोस्टमध्ये टाका थेट कचर्‍यात फेकण्यापेक्षा पर्यावरणपूरक असा वापर. बागेमध्ये तुम्ही या बटाट्याचे तुकडे मातीत मिसळून ठेवू शकता. यामुळे जमिनीची ओल धरून ठेवण्यास मदत होईल.

7/7
तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर हा बटाटा गाई-म्हशी, जनावरांना शिजवून द्या. कच्चा देऊ नका. पण प्रमाणातच याचा वापर करा. मुलांना शाळेत प्रोजेक्ट देतात. जिथं बटाट्यापासून चित्र किंवा बटाट्यापासून झाड कसं बनतं, अंकुरण ही प्रक्रिया दाखवली जाते. त्यासाठी वापरू शकता.

Ambernath Nagar Parishad Results: शिंदे-चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, अंबरनाथ नगर परिषदेत मोठा उलटफेर, कोणाला किती जागा? वाचा विजयी उमदेवारांची यादी...
शिंदे-चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, अंबरनाथमध्ये मोठा उलटफेर, कोणाला किती जागा?
  • शिंदे-चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, अंबरनाथमध्ये मोठा उलटफेर, कोणाला किती जागा?

View All
advertisement