World Hottest Chilli : जगातील सगळ्यात तिखट मिरची कोणती? खाणं दूर हात लावायचीही हिंमत होणार नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
World Hottest Chilli : मी खूप तिखट खातो, मला झणझणीत आवडतं, असं म्हणत मिरच्या अशाच चावून खाणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येक मिरची कमी-जास्त प्रमाणात तिखट असते. पण जगात सगळ्यात जास्त तिखट मिरची कोणती माहिती आहे का?
advertisement
advertisement
advertisement
SHU नुसार जगातील सगळ्यात तिखट मिरची आहे Pepper X. 2023 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची अधिकृत नोंद आहे. अमेरिकेतील ही मिरची याचा SHU सुमारे 26.9 लाख आहे. ही मिरची इतकी तिखट आहे की ती थेट खाणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं. ही मिरची प्रामुख्याने सॉस, अर्क किंवा संशोधनासाठी वापरली जाते.
advertisement
पेपर एक्सआधी कॅरोलिना रिपर ही जगातील सगळ्यात तिखट मिरची होती. तिचा SHU सुमारे 22 लाख होता. भारतातील भूत जोलोकियासुद्धा एकेकाळी जगातील सर्वात तिखट मिरची होती, याचीही गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. याचा SHU सुमारे 10 लाख होता. यानंतर फक्त भारताचं म्हणाल तर भूत जोलोकियानंतर आंध्र प्रदेशमधील गुंटूर मिरचीचा क्रमांक लागतो.
advertisement
advertisement










