Women Health : महिलांसाठी काय जास्त फायदेशीर, काळे तीळ की पांढरे? छोटा बदल दूर करेल अनेक त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Black and white sesame seeds benefits for women : महिलांच्या आरोग्यासाठी योग्य पोषण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हार्मोनल बदल, आयर्नची कमतरता, हाडांची कमजोरी, थकवा, केस गळणे अशा अनेक समस्यांना महिलांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सामोरे जावे लागते. अशा वेळी आहारात छोटे पण पोषणमूल्यांनी भरपूर घटक समाविष्ट करणे गरजेचे ठरते. तिळ हे असेच एक सुपरफूड आहे. मात्र अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो, पांढरे तिळ चांगले की काळे तिळ? चला जाणून घेऊया दोन्ही तिळांचे फायदे आणि महिलांसाठी योग्य पर्याय कोणता आहे.
advertisement
advertisement
याशिवाय काळे तिळ केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. केस गळणे कमी करणे, केसांची वाढ आणि केस अकाली पांढरे होणे कमी करण्यासाठी काळे तिळ मदत करतात. तसेच शरीरात उष्णता आणि ऊर्जा वाढवण्याचे कामही काळे तिळ करतात, त्यामुळे हिवाळ्यात त्यांचे सेवन अधिक लाभदायक ठरते. PCOS किंवा हार्मोनल असंतुलन असलेल्या महिलांसाठीही काळे तिळ उपयोगी मानले जातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आता प्रश्न असा उरतो की, दोन्ही तिळ फायदेशीर असताना आहारात नेमके कोणते तिळ घ्यावेत? याचे उत्तर प्रत्येक महिलेच्या शरीराच्या गरजा आणि आरोग्याच्या समस्यांवर अवलंबून आहे. आयर्नची कमतरता, केस गळणे, थकवा जाणवत असेल तर काळे तिळ अधिक फायदेशीर ठरतात. तर कॅल्शियमची कमतरता, हाडांची कमजोरी किंवा सांधेदुखी असेल तर पांढरे तिळ योग्य ठरतात.
advertisement
advertisement











