Bones Science : बाळांमध्ये 300 हाडं पण मोठं झाल्यावर 206; उरलेली 94 हाडं जातात कुठे? उत्तर ऐकून थक्क व्हाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही विचार करत बसाल की मग बाळाच्या शरीरात असे किती हाडं असतात आणि मग ते मोठे होताच कमी होतात तर मग ती हाडं जातात कुठे?
आपल्या शरीराची रचना किती अद्भुत आहे, याचा विचार केला तर थक्क व्हायला होते. मानवी शरीराचा मुख्य आधार असतो तो म्हणजे आपला सांगाडा (Skeleton). खरंतर एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात, हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. पण तुम्हाला माहितीय का की माणूस जेव्हा जन्माला येतो, म्हणजे बाळ असताना त्याच्याकडे यापेक्षाही जास्त हाडं असतात.
advertisement
advertisement
ही माहिती ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की, जेव्हा एखादे बाळ जन्माला येते, तेव्हा त्याच्या शरीरात प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 300 हून अधिक हाडे असतात. मग इथे प्रश्न उभा राहतो की, मोठी माणसे झाल्यावर ही अतिरिक्त हाडे नेमकी कुठे जातात? ती विरघळतात की आणखी काही होते? यामागे निसर्गाने केलेली एक खास आणि अत्यंत महत्त्वाची वैज्ञानिक व्यवस्था दडलेली आहे.
advertisement
advertisement
1. लवचिकतेसाठी लहान तुकडे:जन्माच्या वेळी बाळाचा सांगाडा हा अनेक लहान तुकड्यांमध्ये विभागलेला असतो. ही हाडे बरीच लहान असतात आणि एकमेकांपासून थोडी वेगळी असतात. उदाहरणार्थ, बाळाच्या कवटीची (Skull) हाडे जन्मावेळी पूर्णपणे जोडलेली नसतात, त्यांच्यामध्ये जागा असते. यामुळे प्रसूतीची प्रक्रिया (Delivery Process) सुलभ होण्यास मदत होते.
advertisement
2. हाडे नव्हे, तर 'कूर्चा' (Cartilage):बाळाच्या शरीरातील जी 'जास्त' हाडे दिसतात, त्यापैकी अनेक प्रत्यक्षात कठीण हाडे नसतात, तर त्या कूर्चा (कार्टिलेज) या मऊ आणि लवचिक (Flexible) ऊतीपासून (Tissue) बनलेल्या असतात. कूर्चा हा हाडांपेक्षा जास्त लवचिक असतो, ज्यामुळे बाळ गर्भाशयात असताना आणि जन्माच्या वेळी शरीराला सहज वाकवू शकते. सुरक्षित वाढीसाठी ही लवचिकता खूप आवश्यक आहे.
advertisement
advertisement
नेमकी प्रक्रिया काय घडते?अस्थिभवन (Ossification)जन्मानंतर, बाळ जसजसे वाढू लागते, तसतसे कूर्चा (Cartilage) हळूहळू कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेऊन कठीण हाडांमध्ये रूपांतरित होऊ लागतो.अस्थिभवन पूर्ण झाल्यावर, बाळाच्या शरीरातील अनेक लहान हाडे एकमेकांमध्ये मिसळून (फ्यूज होऊन) एक मोठे आणि मजबूत हाड बनवतात. उदा. कवटीचे अनेक लहान तुकडे एकत्र येऊन एक मजबूत कवटी बनते.
advertisement
advertisement









