तुमच्या किचनला द्या मॉडर्न टच! फाॅलो करा 'या' टिप्स; तुमचं स्वयंपाकघर बनेल प्रशस्त आणि सुंदर!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
आधुनिक स्वयंपाकघर हे केवळ स्वयंपाक करण्याची जागा नसून ते घराचे हृदय आणि कौटुंबिक कार्यांचे केंद्र बनले आहे. जागेच्या मर्यादा असूनही...
advertisement
advertisement
जागेच्या अडचणीमुळे आताचे किचन्स (contemporary kitchens) अधिक उपयुक्ततेवर आधारित आहेत. आधुनिक डिझाइनने जुन्या कल्पनांना मागे टाकले आहे आणि अशा ट्रेंड्सचा समावेश केला आहे, ज्यामुळे किचन खूप मोठे दिसते. किचन स्पेसमध्ये वैयक्तिक आवड हा एक वाढता ट्रेंड आहे, जिथे कल्पना आणि सर्जनशीलता उपकरणे आणि नेहमीच्या कॅबिनेट्सच्या पलीकडे जाऊन अनेक मनोरंजक डिझाइन घटकांचा समावेश करते.
advertisement
नवीन रंग, मॉड्युलर किचन (modular kitchen), मोनोक्रोमॅटिक डिझाइन (monochromatic design) या काही गोष्टी आहेत ज्या लोक त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना विचारात घेतात. सेंट गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष, सेल्स आणि मार्केटिंग, सुदीप कोल्टे यांनी तुमच्या किचनला थोडासा खास टच देण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
advertisement
जवळजवळ प्रत्येक किचनला ज्या समस्येचा सामना करावा लागतो तो म्हणजे स्टोरेज! नूतनीकरण करताना हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक इंच जागेचा पुरेपूर वापर करून, न वापरल्या जाणाऱ्या जागांची पुनर्रचना करून आणि जिथे आवश्यक असेल तिथे अतिरिक्त सोल्यूशन्स (solutions) वापरून एका लहान खोलीलाही मोहक जागेत रूपांतरित करता येते.
advertisement
भिंतींना ताजे रंग देणे, कलात्मक वॉलपेपर किंवा पॉप कलर्स किचनला नवीन रूप देण्यासाठी खूप मदत करतील. समकालीन कॅबिनेट्स पूर्वी विटा आणि सिमेंट वापरून बनवले जात होते, पण आता जिप्सम-आधारित ड्राय वॉल्सचा वापर बाजारात मोठ्या प्रमाणात केला जातो. वॉटर रेसिस्टंट ड्राय वॉल्स हा नवीन ट्रेंड आहे, जो स्वस्त, टिकाऊ, पुनर्वापर करण्यायोग्य आणि कमी वेळेत स्थापित करणे सोपे आहे. अशा उत्पादनांमुळे नूतनीकरण करणे सोपे आणि जलद वाटते.
advertisement
ओपन शेल्फ : किचनला घराचे हृदय मानले जाते, त्याचप्रमाणे किचन्ससाठी कॅबिनेट्स महत्त्वाचे असतात. ओपन शेल्फमुळे संपूर्ण जागेच्या वातावरणाला उत्साह मिळतो. बंद दारांऐवजी काचेचे दरवाजे लावल्याने लुक आणि डिझाइनAspect वाढतो. वॉटर रेसिस्टंट ड्राय वॉल्स वापरून फ्लेक्सिबल शेल्फ बसवणे, जे मल्टी-पर्पज शेल्फ वापरले जाऊ शकतात, हे स्मार्ट किचनसाठी आधुनिक युगाचे सोल्यूशन आहे. जड बॉक्स कॅबिनेट्सऐवजी साधे जिप्सम-आधारित बोर्ड देखील डिझाइनला अधिक आकर्षक बनवू शकते.
advertisement
खोलीला प्रकाशमय करा : किचनमधील कामे करण्यासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था अत्यावश्यक आहे. प्रकाशयोजना सर्जनशील होण्याची संधी देते, टास्क लाइटिंग आणि अँबिएंट लाइटिंगच्या मिश्रणाने उद्देश आणि स्टाइलचा योग्य समतोल साधता येतो. सीलिंग लाईट्स नेहमीच कोणत्याही जागेसाठी डेकोरेटिव्ह घटक राहिलेले आहेत, त्यामुळे फॉल्स सीलिंग उबदार वातावरण तयार करण्यास मदत करतात.