Photography Exhibition : आधी जहांगीर आर्ट गॅलरी गाजवली, आता अमरावतीत प्रदर्शन, तरुणीने काढलेल्या छायाचित्रांची अनेकांना भुरळ

Last Updated:
चित्रकला ही एक महत्त्वाची कला आहे. ती माणसाला एक वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते. मात्र, अमरावती येथील एका तरुणीने अशा पद्धतीने छायाचित्र काढलेत की जणू ती एक प्रकारची पेंटिंगच भासत आहे. या तरुणीच्या या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन अमरावती शहरातील विजय राऊत आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. जहांगीर आर्ट गॅलरी गाजवलेली ही तरुणी नेमकी कोण आहे, कशाप्रकारे तिचा प्रवास सुरू झाला हे जाणून घेऊयात. (फोटोज-वैखरी यावलीकर)
1/11
वैखरी यावलीकर असे या तरुणीचे नाव आहे. अमरावती येथील छायाचित्रकार वैखरी यावलीकर हिचे 2018 मध्ये बीएस्सीचे शिक्षण अमरावती येथून पूर्ण केले.

advertisement
2/11
यानंतर तिने पुण्यातील डेक्कन कॉलेज येथून आर्किऑलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वैखरीने भोपाळ येथील इंदिरा गांधील राष्ट्रीय मानव संग्रहालय याठिकाणी तिने इंटर्नशिप केली.

3/11
यानंतर तिने सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत रिसर्च फॉर रिसर्जेन्स फाउंडेशन, नागपूर येथे रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरीही केली. यानंतर तिने आता आपली जोपासण्यासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

4/11
डिसेंबर 2022 मध्ये मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तिने काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या दरम्यान तिच्या या प्रदर्शनात संगीतकार कौशल इनामदार, प्रशांत गोडबोले, भगवान रामपूरे, श्रीधर अंबोरे, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके आणि प्रभा गणोरकर यांनी भेट देत तिच्या छायाचित्रांचे कौतुक केले होते.

5/11
आता अमरावती येथील विजय आर्टमध्ये 4 फ्रेबुवारीपासून तिच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

6/11
छंद म्हणून मी फोटोग्राफी सुरू केली होती. आवड म्हणून मी फोटो काढायला सुरुवात केली, असे वैखरी सांगते. वैखरीचे वडील सुनील यावलीकर हे एक प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांनी काढलेली चित्रेही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झळकली आहेत.

7/11
अतिशय कमी वयात तिला इतक्या चांगल्या प्रकारे फोटो काढण्याची कला अवगत झाली. तिने काढलेले काही फोटो हे निसर्गाचे फोटो आहेत.

8/11
मात्र, हे फोटो पाहताना असे वाटते की, तिने काढलेले हे फोटो नसून एक प्रकारे पेंटिंगच आहे. मात्र, हे रेखाटन नसून तिने तिच्या कॅमेऱ्यातूनच हे सर्व फोटो काढले आहे. तिच्या फोटोमध्ये सुंदर रंगसंगती पाहायला मिळते.

9/11
माझा आणि फोटोग्राफीचा काही संबंध नव्हता. मात्र, मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून ऊन, सावलीचे फोटो टिपायला लागले.

10/11
अनेकांनी मी काढलेल्या फोटोंचे कौतुक केले आणि माझ्या फोटोग्राफीला थेट जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जागा मिळाली, असेही ती न्यूज18 लोकलसोबत बोलताना म्हणाली.

11/11
अमरावती शहरातील विजय आर्ट गॅलरीमध्ये 18 फेब्रुवारीपर्यंत वैखरी यावलीकर हिच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तुम्हीही याठिकाणी भेट देऊ वैखरीने काढलेल्या छायाचित्र प्रत्यक्षात पाहू शकता.

Beed Crime News : कामाचं आमिष दाखवलं,  बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं!
कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं
  • कामाचं आमिष दाखवलं, बारामतीच्या तरुणीवर आंबेजोगाईत सामूहिक अत्याचार, बीड हादरलं

View All
advertisement