Vidarbha Weather : पुढील 72 तास महत्त्वाचे, विदर्भात वादळी वाऱ्यांसह पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather : आज 21 मे रोजीही विदर्भातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/7
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील वातावरणात अचानक बदल घडून आलेत. विविध भागांत मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढीस लागले.

advertisement
2/7
दिवसेंदिवस ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वाढतच आहे. आज 21 मे रोजीही विदर्भातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

3/7
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. येलो अलर्ट जारी केलेल्या या शहरांमध्ये आकाश सतत ढगाळ राहणार असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.

4/7
काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरीही कोसळू शकतात. यामुळे विजेपासून संरक्षित राहणे, घराबाहेर जाण्याचे टाळणे आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

5/7
पावसाबरोबरच विदर्भात उष्णतेची तीव्रता देखील कायम आहे. तेथील कमाल तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

6/7
पाऊस आणि उष्णता दोन्हीमुळे दमट वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे. बाहेर जाणे टाळावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी देखील हवामानाच्या बदलत्या स्थितीकडे लक्ष ठेवून शेतीच्या कामात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

7/7
वादळी वाऱ्यांमुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे पिकांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात अशीच परिस्थिती राहू शकते. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement