बारावी परीक्षेत राज्यात अव्वल, कोण आहे 100 टक्के गुण मिळवणारी तनिषा बोरामणीकर?

Last Updated:
बारावी परीक्षेत राज्यातील एकमेव विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालीय. तनिषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती छत्रपती संभाजीनगर येथील आहे.
1/7
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यातील मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली.

advertisement
2/7
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यात राज्यातील एकमेव विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

3/7
 तनिषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगर</a> येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला बारावीत एकूण 518 गुण मिळाले.

4/7
तनिषाला बारावीतील 518 गुणांसह 18 क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. तनिषा ही राष्ट्रीय स्तरावर खेळलेली बुद्धीबळपटू आहे.

5/7
ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात तनिषाला शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी विषयात 89, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात 95 तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण मिळाले आहेत.

6/7
तनिषा बुध्दीबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. बुद्धीबळाचा पट गाजवणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी केलीय.

7/7
दरम्यान, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे. तिने केवळ अभ्यासतच नाही तर क्रीडा क्षेत्रातही कामगिरी केलीय. सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तनिषाचा बोर्डातर्फे सत्कार केला जाणार असल्याचेही गोसावी यांनी सांगितले. (फोटो: Tanisha SAGAR Boramanikar फेसबुक पेजवरून साभार)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement