Weather Alert: हाडं गोठवणारी थंडी, मराठाड्यात पारा घसरला, पाहा कुठं किती तापमान?

Last Updated:
Weather update: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा गारठा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर ते बीड आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पारा घसरला आहे. गेल्या आठवडाभरामध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असल्याने हाडं गोठवणारी थंडी मराठवाड्यात राहणार आहे. आज 2 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह आठ जिल्ह्यांमध्ये हवामान कसं राहील? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यतः आकाश निरभ्र राहणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच पुन्हा गारठा वाढला आहे. कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. जालन्यात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून तापमानात 2 अंशांनी घट होईल. तर परभणीत देखील निरभ्र आकाशासह थंडीचा कडाका जाणवेल.

3/5
बीड जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून तापमानात घट होऊ शकते. परिणामी थंडीमध्ये वाढ होईल. त्यामुळे कमाल तापमान 27.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14.1 अंश सेल्सिअस इतके राहील. सकाळ व संध्याकाळच्या वेळेला थंडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत सामान्यतः आकाश निरभ्र असणार आहे. याबरोबरच गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/5
लातूर जिल्ह्यात तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. तसेच मंगळवारी वातावरण कोरडे असणार आहे. कमाल तापमान अंदाजे 28.0 अंश, तर किमान तापमान 14.0 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात निरभ्र आकाशासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

5/5
मराठवाड्यात गेल्या आठवड्यात तापमानात वाढ झाली होती. परंतु, डिसेंबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत असून थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. 2 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला नाही. मात्र थंडीचा कडाका कायम राहील. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement